Throw Shoes Towards Krunal Pandya : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 च्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बडोदा आणि झारखंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात बडोदाचा कर्णधार कृणाल पांड्या जेव्हा फॅन्सना ऑटोग्राफ देण्यासाठी बाउंड्री रोपजवळ आला तेव्हा एका प्रेक्षकाने त्याच्या दिशेने बूट भिरकावला. या फेकलेला बूट लागण्यापासून कृणाल पांड्याला ठोक्यात वाचला. सुरुवातीला राग व्यक्त करण्याऐवजी कृणालने संयम बाळगला आणि त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आलेल्या फॅन्सला नाराज न करता तो तेथे उभा राहिला.
बूट लागण्यापासून ठोक्यात बचावला कृणाल :
संपूर्ण घटना तेव्हा घडली जेव्हा कृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोदा संघाने झारखंडला ५ विकेटने पराभूत केले. सामना संपल्यानंतर कृणाल पांड्या हा बाउंड्री लाईनवर वाट पाहत होता, तेव्हा फॅन्सने याला ऑटोग्राफ देण्यासाठी बोलावलं. कृणालने बाउंड्री रोप पार करताच गर्दीतून एका प्रेक्षकाने कृणालच्या दिशेने बूट भिरकावला. कृणाल पांड्याने त्याच्या दिशेने येणार एक बूट पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हद्द तेव्हा झाली जेव्हा अजून एक बूट कृणालच्या दिशेने भिरकावला गेला. कृणाल पांड्या या घटनेत दुखापत होण्यापासून वाचला खरा मात्र त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याने बूट फेकणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने बोट केले आणि त्याला सक्त ताकीद दिली. मात्र काही वेळानंतर कृणाल लगेचच शांत झाला आणि इतर फॅन्सना ऑटोग्राफ देऊ लागला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Someone at Krunal Pandya After the SMAT match, Krunal Pandya was heading towards the fans to give autographs when suddenly, a fan threw his shoes at him. Krunal narrowly escaped getting hit and warned the fan not to repeat such behaviour. Later, he even signed an autograph inside a fan's jacket cap.
Mukku (CricMukku) November 25, 2026
कृणालच्या नेतृत्वात बडोदा संघाची उत्तम कामगिरी :
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये कृणाल पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा बडोदा संघ हा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स करत असून आतापर्यंत स्पर्धेत खेळण्यात आलेल्या 6 पैकी 5 सामने त्यांनी जिंकले आहेत. चंदीगड विरुद्ध एका सामन्यात पराभव झाल्यावर उर्वरित सर्व सामने जिंकून बडोदा संघ सध्या 20 पॉईंट्सने ग्रुपच्या टॉप स्थानावर आहेत.