SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवा कर्णधार? अक्षर पटेल स्वतः कर्णधारपदावरून घेतोय माघार?

IPL 2027 Delhi Capitals Captain : आयपीएल 2027 पूर्वी अनेक अनेक संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. अशातच दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून सुद्धा एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आगामी सीजनमध्ये अक्षर पटेल हा संघाचं नेतृत्व करण्यास उत्सुक नसल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेलं आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 12, 2026, 03:06 PM IST | Updated: Nov 12, 2026, 03:34 PM IST
Image Credit: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवा कर्णधार? अक्षर पटेल स्वतः कर्णधारपदावरून घेतोय माघार?
Join

IPL 2027 Delhi Capitals Captain : आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सची डोकेदुखी वाढली आहे. सध्या संघ आपल्या नेतृत्वाच्या मुद्दावरून पेच प्रसंगात अडकलेला आहे, भारतीय ऑलराऊंडर अक्षर पटेल हा मागच्या दोन सीजनपासून दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करतोय. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षर पटेलला स्वतः दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदावरून हटण्याची इच्छा आहे. त्यामुळे आता आगामी आयपीएल 2027 साठी संघाला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार दिल्ली कॅपिटल्सच्या मॅनेजमेंटला नकोय की अक्षर पटेलने कर्णधारपदावरून दूर व्हावे, त्यामुळे अक्षरलाच आगामी सीजनमध्ये कर्णधार बनवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला थोडी नेहन्त करावी लागू शकते. अक्षर पटेलच्या नेतृत्वात मागील दोन वर्ष दिल्ली कॅपिटल्सचा परफॉर्मन्स साधारण राहिला. संघ आयपीएल 2026 मध्ये प्लेऑफसाठी क्वालिफाय करू शकली नव्हती.  

दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करण्यासोबतच अक्षर पटेल हा फलंदाजी आणि गोलंदाजी करून सुद्धा संघात योगदान देत असतो. मात्र मागच्या वर्षी अक्षर पटेल फॉर्मात दिसला नाही. 11 इनिंगमध्ये त्याने फलंदाजी करत 173 धावा केल्या तर 11 इनिंगमध्ये त्याने 5 विकेट घेतले होते.

अक्षर पटेलच्या ट्रेडला दिल्लीचा नकार :

रिपोर्ट्समधून असे देखील समोर आलं की काही फ्रेंचायझींनी अक्षर पटेलला आपल्या संघात घेण्यासाठी ट्रेड डील ऑफर केल्या होत्या. मात्र दिल्ली कॅपिटल्सने सर्वांना नकार दिला. एका सूत्राने नाव न सांगण्याच्या हवाल्याने सांगितलं की, 'अक्षर कर्णधारपदावर कायम राहण्यास फारसा उत्सुक नाही. व्यवस्थापन त्याला राजी करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तो फ्रँचायझीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. या सीजनमध्ये संघाने अनेक 'ट्रेड' प्रस्ताव फेटाळून लावले आहेत. व्यवस्थापनाने कर्णधारपदाबाबतचा अंतिम निर्णय ऑक्शन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे'.

ऋषभ पंत पुन्हा बनणार संघाचा कर्णधार?

दिल्ली कॅपिटल्सकडे अक्षर पटेल वगळता ऋषभ पंत हा कर्णधारपदासाठी एक चांगला पर्याय आहे. मागच्या दोन सीजनमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचं नेतृत्व करणारा ऋषभ पंत हा पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे. ऋषभ पंत हा यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार राहिलेला होता. त्यामुळे अक्षर पटेल तयार नसेल तर ऋषभकडे कर्णधारपद सोपवलं जातं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES