• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /मुंबई सह चेन्नई सुपरकिंग्सला मोठा धक्का! युवा स्टार क्रिकेटरला पुन्हा दुखापत, दोन महिने मैदानापासून दूर राहणार?

मुंबई सह चेन्नई सुपरकिंग्सला मोठा धक्का! युवा स्टार क्रिकेटरला पुन्हा दुखापत, दोन महिने मैदानापासून दूर राहणार?

Ayush Mhatre Injury : रणजी ट्रॉफी 2026-27 सीजनच्या पहिल्या सामन्यादरम्यान आयुषला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आगामी सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याची दुखापत पाहून तो जवळपास दोन महिने मैदानापासून दूर राहील अशी शक्यता आहे. मात्र यामुळे मुंबईचा रणजी ट्रॉफी संघ आणि चेन्नई सुपरकिंग्स संघ यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय.

Reported Bypooja pawar
Published: Oct 14, 2026, 09:09 AM IST|Updated: Oct 14, 2026, 10:03 AM IST
joinshare
मुंबई सह चेन्नई सुपरकिंग्सला मोठा धक्का! युवा स्टार क्रिकेटरला पुन्हा दुखापत, दोन महिने मैदानापासून दूर राहणार?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Ayush Mhatre Injury : भारताचा अंडर 19 वर्ल्ड कप 2026 चा विजेता कर्णधार आयुष म्हात्रे हा पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 11 ऑक्टोबर पासून रणजी ट्रॉफी 2026-27 चा पहिला सामना चंदीगड विरुद्ध मुंबई यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात आयुष म्हात्रे हा मुंबई संघाचा उपकर्णधार होता. तसेच आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत असताना झालेल्या दुखापतीतून अनेक महिन्यांनी बरा होऊन तो रणजी ट्रॉफी सामन्यात पुनरागमन करत होता. मात्र या सामन्यात त्याला दुर्दैवाने पुन्हा दुखापत झाली. रणजी ट्रॉफी 2026-27 सीजनच्या पहिल्या सामन्यादरम्यान आयुषला उजव्या हॅमस्ट्रिंगमध्ये 'ग्रेड 4' ची गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे प्राथमिक माहितेनुसार आयुष हा पुढील जवळपास दोन महिने क्रिकेट पासून दूर राहण्याची शक्यता आहे.

पुनरागमन सामन्यात पुन्हा दुखापत :

आयुष म्हात्रे हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. आयपीएल 2026 मध्ये सामना खेळत असताना आयुषच्या उजव्या पायाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झालेली. तो सध्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघासाठी खेळतो. दुखापतीमुळे त्याने आयपीएलचे फक्त 6 सामने खेळले. बंगळुरू येथील बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये तीन महिने पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो नुकताच मैदानावर परतला होता. आता रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याला दुखापत झाली आहे.

मुंबई रणजी संघाचा कर्णधार सिद्धेश लाड म्हणाला की, 'तो काही काळ संघासोबत नसेल असे असं सध्या तरी दिसतंय. सामन्यादरम्यान तो ज्या प्रकारे लंगडत चालत होता, त्यावरून तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल असे वाटत नाही'.

कशी झाली दुखापत?

रणजी ट्रॉफी 2026-27 साठी आयुष म्हात्रेला मुंबईचं उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. रविवारी मुंबईसाठी ओपनिंग फलंदाजी करताना म्हात्रेच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. त्यानंतर चंदीगडच्या दोन्ही डावांदरम्यान त्याने फिल्डिंग केली नाही. विकेट्सच्या दरम्यान धावताना त्याला ही दुखापत झाली. अखेरीस 48 धावा केल्यावर तो बोल्ड झाला. आपल्या खेळीदरम्यान धावा घेताना तो अनेकदा लंगडताना दिसला. मुंबईने वानखेडे स्टेडियमवर चंदीगडविरुद्ध डावाने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 429 धावा केल्या. चंदीगडने पहिल्या डावात 78 धावा केल्या आणि फॉलोऑन खेळताना 196 धावांत ऑलआऊट झाले. मुंबईने एक डाव आणि 155 धावांनी विजय मिळवला.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Sports News
Cricket News
News in Marathi