• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यरने कोणावर फोडलं खापर?

चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यरने कोणावर फोडलं खापर?

बुधवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात टीम इंडियाचा २४ धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघातील काही खेळाडूंना या पराभवासाठी कारणीभूत ठरवलं.

Reported Bypooja pawar
Published: Oct 15, 2026, 08:04 AM IST|Updated: Oct 15, 2026, 08:36 AM IST
joinshare
चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यरने कोणावर फोडलं खापर?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS WI T20 Series :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टी20 सीरिजचा चौथा सामना हा हैदराबाद येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताचा 24 धावांनी दारुण पराभव झाला. त्यामुळे आता ही पाच सामन्यांची टी20 सीरिज 2-2 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आता सीरिजचा शेवटचा सामना हा निर्णायक ठरणार असून यातील विजेता संघ हा आघाडी घेऊन सीरिज जिंकेल. बुधवारी सामन्यात पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर भडकला. सामन्यात पराभवाचं कारण विचारल्यावर त्याने थेट गोलंदाजांवर खापर फोडलं.

गोलंदाजी पराभवासाठी कारणीभूत :

कर्णधार श्रेयस अय्यरला जेव्हा टीम इंडियाच्या परफॉर्मन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, पराभवाची कहाणी ही गोलंदाजीनेच सुरु होते. गोलंदाजांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, त्यांना योग्य टप्पा लाइन आणि लेंथ राखण्यात अपयश आले, ज्याचा परिणाम असा झाला की समोर 250 धावांचे लक्ष्य उभे राहिले. त्यांनी मान्य केले की धावांचा पाठलाग करताना फलंदाजांचा दृष्टिकोन कौतुकास्पद होता; मात्र, गोलंदाज आपापल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकले नाहीत जे पराभवाचे एक मुख्य कारण ठरले.

श्रेयस अय्यरचा हा दावा की त्याच्या गोलंदाजांना योग्य लाईन आणि लेंथ राखण्यात अपयश आले. कितपत योग्य आहे, हे तुम्ही या आकडेवारीवरून तपासू शकता असे तो म्हणाला.  हैदराबादमधील सामन्यात तसेच त्याआधीच्या दोन टी20 सामन्यांत, भारतीय गोलंदाजांनी 200 हून अधिक धावा दिल्या. हे तिन्ही सामने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी20 सीरिजचा भाग आहेत.

अर्शदीप सिंग हा असा भारतीय गोलंदाज ठरला ज्याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक सात वेळा 50  किंवा त्यापेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. हैदराबाद टी20 सामन्यात अर्शदीप सिंगसोबतच मयांक यादव या आणखी एका भारतीय वेगवान गोलंदाजानेही 50 हून अधिक धावा दिल्या. याव्यतिरिक्त अर्शदीप सिंग हा एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकूण 150 अतिरिक्त बॉल टाकले आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत 132 वाईड्स आणि 18 नो बॉल्सचा समावेश आहे. ही आकडेवारी कसोटी खेळणाऱ्या देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलंदाजांच्या संदर्भातील आहे. हैदराबादमध्ये प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 247 धावा केल्या. भारतीय संघ 19.3 ओव्हरमध्ये 223 धावांत ऑलआउट झाला.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
IND vs WI
Marathi News
Cricket News
Shreyas Iyer
Team india