SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IND vs NZ मालिकेच्या तीनही सामन्याचे वेळापत्रक पहा एका क्लिकवर! वाचा सविस्तर

दोन मालिका घरच्या मैदानावर झाल्यानंतर टीम इंडिया आता परदेश दौऱ्यावर जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन मालिका खेळवल्या जाणार आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका 22 ऑक्टोबर रोजी खेळवली जाणार आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 19, 2026, 10:28 PM IST | Updated: Oct 19, 2026, 10:39 PM IST
Join

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये एकदिवसीय आणि टी20 मालिका पार पडली, एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने विजय मिळवला तर टी20 मालिका बरोबरीत संपली. आता टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन मालिका घरच्या मैदानावर झाल्यानंतर टीम इंडिया आता परदेश दौऱ्यावर जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन मालिका खेळवल्या जाणार आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका 22 ऑक्टोबर रोजी खेळवली जाणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी रवाना झाली आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी या मालिकेसाठी संघाची घोषणा केली होती.

टी20 मालिका झाल्यानंतर भारताची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका ही 4 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. तर त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची देखील मालिका खेळवली जाणार आहे ही मालिका 19 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. 

टी20 मालिका

पहिला टी20 आंतरराष्ट्रीय - 22 ऑक्टोबर - हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च - दुपारी 12.30 / भारतात रात्री 8.00
दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय - 24 ऑक्टोबर - हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च - दुपारी 12.30/ भारतात रात्री 8.00
तिसरा टी20 आंतरराष्ट्रीय - 27 ऑक्टोबर - हेन्री स्टेडियम, वेलिंग्टन - दुपारी 12.30/ भारतात रात्री 8.00
चौथा टी20 आंतरराष्ट्रीय - 30 ऑक्टोबर - ईडन पार्क, ऑकलंड - दुपारी 12.30/ भारतात रात्री 8.00
पाचवा टी20 आंतरराष्ट्रीय - 1 नोव्हेंबर - सेडन पार्क, हॅमिल्टन - दुपारी 12.30/ भारतात रात्री 8.00

हे ही वाचा

कॅप्टन स्मृती मानधनाचा संघ एकतर्फी मालिका जिंकणार? वाचा शेवटच्या सामन्याची संपूर्ण माहिती

एकदिवसीय मालिका

पहिला एकदिवसीय सामना - 4 नोव्हेंबर - ईडन पार्क, ऑकलंड - दुपारी 3.00
दुसरा एकदिवसीय सामना - 7 नोव्हेंबर - स्काय स्टेडियम, वेलिंग्टन - दुपारी 3.00
तिसरा एकदिवसीय सामना - 10 नोव्हेंबर - सेडन पार्क, हॅमिल्टन - दुपारी 3.00
चौथा एकदिवसीय सामना - 13 नोव्हेंबर - बे ओव्हल, माउंट माउंगानुई - दुपारी 3.00
पाचवा एकदिवसीय सामना - 15 नोव्हेंबर - बे ओव्हल, माउंट माउंगानुई - दुपारी 3.00

कसोटी मालिका

पहिली चाचणी - 19-23 नोव्हेंबर - बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन - रात्री 10.00 (18 नोव्हेंबर) / सकाळी 11.00
दुसरी चाचणी - 27 नोव्हेंबर – 1 डिसेंबर - हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च - रात्री 10.00 (२६ नोव्हेंबर) / सकाळी 11.00

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES