• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /कॅप्टन स्मृती मानधनाचा संघ एकतर्फी मालिका जिंकणार? वाचा शेवटच्या सामन्याची संपूर्ण माहिती

कॅप्टन स्मृती मानधनाचा संघ एकतर्फी मालिका जिंकणार? वाचा शेवटच्या सामन्याची संपूर्ण माहिती

भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना शिल्लक आहे पण टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यामध्ये एकतर्फी सामना जिंकून मालिकेमध्ये विजय मिळवला आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 19, 2026, 09:22 PM IST|Updated: Oct 19, 2026, 09:32 PM IST
joinshare
कॅप्टन स्मृती मानधनाचा संघ एकतर्फी मालिका जिंकणार? वाचा शेवटच्या सामन्याची संपूर्ण माहिती

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे, टीम इंडियाने स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारतीय संघाची मालिकांमध्ये विजयी सुरुवात केली आहे. भारताच्या संघासमोर पहिल्या सामन्यामध्ये झिम्बाब्वेच्या संघाने मोठे आव्हान उभे केले होते त्यावेळी दिप्ती शर्मा आणि निकी प्रसाद या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघाची खेळी सांभाळली आणि भारताच्या संघाला विजय मिळवून दिला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी प्रभावी पाहायला मिळाली आणि टीम इंडियाने दुसऱ्या मालिकेच्या सामन्यामध्ये एकतर्फी सामना 9 विकेट्सने जिंकला.

दुसऱ्या सामन्याचा अहवाल

103 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार सुरुवात केली. सलामीवीर शफाली वर्माने अवघ्या 25 चेंडूंमध्ये 55 धावा ठोकल्या. 220 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना शफालीने सहा चौकार आणि चार उत्तुंग षटकार ठोकले. कर्णधार स्मृती मंधानाने 25 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा करून तिला चांगली साथ दिली. 188 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना मंधानाने सहा चौकार आणि दोन उत्तुंग षटकार ठोकले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अनुष्का शर्माने नाबाद 1 धाव काढली. तिच्या या खेळीमुळे टीम इंडियाने अवघ्या 8.5  षटकांत 1 गडी गमावून 104 धावा केल्या. यासह टीम इंडियाने 11षटके आधीच 9 गडी राखून सामना जिंकला. या विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघाने मालिका 2-0 ने जिंकली आहे. झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाकडून बिलाउड बिझाने 1 बळी घेतला.

हे ही वाचा

रमेश पवार मुख्य निवडकर्ता का झाले नाहीत? बीसीसीआयने स्वत: केले स्पष्ट

कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघाचा तिसरा आणि मालिकेचा शेवटचा सामना हा 20 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेचा तिसरा आणि शेवटच्या सामन्याचे आयोजन हे रायपूरच्या मैदानावर होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहॅाटस्टारवर क्रिकेट चाहत्यांना भारतामध्ये पाहायला मिळणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला सुरुवात 7.00 वाजता सुरु होणार आहे तर या सामन्याचे नाणेफेक 6.30 वाजता होणार आहे. 

भारतीय महिला टीम

स्मृति मंधाना (कर्णधार), शैफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांति गौड़, गुनालन कमलिनी, प्रेमा रावत, जिन्तिमणि कलिता, मिन्नू मणि

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Smriti Mandhana
Cricket News