• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /क्रिकेटर रिंकू सिंहने पंतप्रधान मोदींना दिलं लग्नाचं आमंत्रण, रिंकू आणि प्रिया कधी अडकणार विवाहबंधनात?

क्रिकेटर रिंकू सिंहने पंतप्रधान मोदींना दिलं लग्नाचं आमंत्रण, रिंकू आणि प्रिया कधी अडकणार विवाहबंधनात?

Rinku Singh And Priya Saroj Wedding : क्रिकेटर रिंकू सिंह याने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. स्टार फलंदाज रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज हे लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या विवाहाचे आमंत्रण रिंकूने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

Reported Bypooja pawar
Published: Nov 15, 2026, 04:07 PM IST|Updated: Nov 15, 2026, 04:27 PM IST
joinshare
क्रिकेटर रिंकू सिंहने पंतप्रधान मोदींना दिलं लग्नाचं आमंत्रण, रिंकू आणि प्रिया कधी अडकणार विवाहबंधनात?
Image Credit: क्रिकेटर रिंकू सिंहने पंतप्रधान मोदींना दिलं लग्नाचं आमंत्रण, रिंकू आणि प्रिया कधी अडकणार विवाहबंधनात?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Rinku Singh And Priya Saroj Wedding : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. तेव्हा क्रिकेटर रिंकू सिंह याने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांना आपल्या विवाहाचे आमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचा फोटो रिंकू सिंहने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी रिंकू सिंहची आई, बहीण सुद्धा यावेळी उपस्थित होते. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात रिंकू सिंहच्या वडिलांचं दुःखद निधन झालं, तेव्हा रिंकू हा टी20 वर्ल्ड कप संघाचा भाग होता. मात्र आता वडिलांच्या निधनाचं दुःख पाठीवर ठेऊन तो भारतीय संघात पुन्हा सामील झाला. या कारणाने रिंकू आणि प्रिया सरोजचे लग्न हे पुढे ढकलण्यात आलं. 

4 डिसेंबर रोजी लखनऊमध्ये होणार विवाह :

रिंकू सिंह समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज हिच्याशी विवाह करणार आहेत. प्रिया सरोज उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते. रिंकू सिंहआणि प्रिया सरोज 4 डिसेंबर 2026 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. हा विवाह सोहळा लखनऊमधील रामाडा हॉटेलमध्ये पार पडणार आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू असून, पाहुण्यांना आमंत्रणपत्रिका पाठवण्याचे कामही सुरू झाले आहे.

या समारंभाला क्रिकेट आणि राजकारणातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिल्यानंतर, रिंकूने त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माझ्या कुटुंबासह भेट घेता आली, हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी त्यांना माझ्या लग्नाचे निमंत्रण दिले आणि त्यांचे आशीर्वादही घेतले. हा आमच्यासाठी खरोखरच एक विशेष क्षण आहे'.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना लग्नाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. दरम्यान रिंकूच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि त्यांना स्वतः लग्नाचे निमंत्रण दिले. 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india
PM Narendra Modi