• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /शाहरुख खानचा शेजारी झाला सूर्यकुमार यादव, दुबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

शाहरुख खानचा शेजारी झाला सूर्यकुमार यादव, दुबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

Suryakumar Yadav Dubai Home : टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने दुबईत नवं घर खरेदी केलं आहे. नुकतंच सोशल मीडियावर याविषयी व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात सूर्याने दुबईत घर का खरेदी केलं हे सुद्धा सांगितलं आहे.

Reported Bypooja pawar
Published: Oct 14, 2026, 12:35 PM IST|Updated: Oct 14, 2026, 01:17 PM IST
joinshare
शाहरुख खानचा शेजारी झाला सूर्यकुमार यादव, दुबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल
Image Credit: शाहरुख खानचा शेजारी झाला सूर्यकुमार यादव, दुबईत खरेदी केलं आलिशान घर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Suryakumar Yadav Dubai Home : भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने यंदाचा टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकला आहे. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादवकडून भारतीय संघाचं नेतृत्व सुद्धा काढून घेण्यात आलं त्याला टीम इंडियात अद्याप संधी देण्यात आलेली नाही. मात्र सूर्यकुमार यादव हा अजूनही क्रिकेट खेळत असून त्याने नुकतंच एका लोकल टी20 स्पर्धेत सहभाग घेतला होता. सध्या सूर्यकुमार यादव हा चर्चेत आला आहे तो म्हणजे त्याच्या गुंतवणुकीमुळे. सूर्यकुमार यादवने दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे.

सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यात तो प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही करतोय तर येवले सूर्यकुमारची पत्नी देविशा सुद्धा त्यांच्या सोबत आहे. सूर्याने डॅन्यूब प्रॉपर्टीजकडून एक घर विकत घेतले आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादवने खुलासा सुद्धा केला की त्याने दुबईत घर का घेतलं.

सूर्यकुमार यादवने सांगितले की, त्याला दुबईला यायला आवडतं. तो पहिल्यांदा 2014 च्या आयपीएलदरम्यान येथे आला होता. येथे राहताना एक वेगळ्या प्रकारची सुखद भावना जाणवत असल्याचे सूर्यकुमारने सांगितलं. तसेच सुरक्षितता हे त्यामागचे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सुद्धा सूर्या म्हणाला.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शाहरुख खानचा बनला शेजारी :

सूर्यकुमार यादवने बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या शाहरुख खानच्या बिल्डिंगजवळ त्याचं नवीन घर खरेदी केलं. डॅन्यूब ग्रुप दुबईमध्ये 'Shahrukhz Residence' नावाची इमारत बांधत आहे. सूर्याने अगदी त्याच इमारतीजवळ एक घर विकत घेतले आहे. त्याच व्हिडिओच्या शेवटी सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याबाबत काही गंमतीशीर गोष्टीही केल्या. दरम्यान  सूर्यकुमारची पत्नी देविशाने नमूद केले की तिच्या सूचनेनुसार दुबईमध्ये मालमत्ता खरेदी करून सूर्यकुमारने योग्य निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवने दुबईमध्ये मालमत्तेत गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सूर्यकुमार यादवच्या या दुबईतील नव्या घराची अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र याची किंमत सुमारे 2.85 ते 14 कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Shah Rukh Khan
Suryakumar Yadav
Marathi News
Marathi Batmya
News in Marathi