SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी मैदानात भयंकर अपघात, स्टार खेळाडूच्या डोक्याला दुखापत, संघाचं टेन्शन वाढलं

IND VS NZ ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी स्टार खेळाडूला प्री मॅच ट्रेनिंग दरम्यान डोक्याला दुखापत लागल्याची घटना घडली आहे. यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यातून खेळाडू बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाचं टेन्शन नक्कीच वाढलं असेल .

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 03, 2026, 03:33 PM IST | Updated: Nov 03, 2026, 04:10 PM IST
Image Credit: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी मैदानात भयंकर अपघात, स्टार खेळाडूच्या डोक्याला दुखापत, संघाचं टेन्शन वाढलं
Join

IND VS NZ ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 4 नोव्हेंबर पासून पाच सामन्यांच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी स्टार खेळाडूंसोबत प्री मॅच ट्रेनिंग सेशनमध्ये एक अपघात घडला. ज्यामुळे आता स्टार खेळाडू बुधवारी होणाऱ्या पहिल्या सामन्याला मुकणार आहे. मंगळवारी ईडन पार्क येथे प्री मॅच ट्रेनिंग सेशन दरम्यान वेगवान गोलंदाज हॅट हेनरी सोबत टक्कर झाल्याने न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेवोन कॉनवे याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर कनकशनमुळे डेवोन कॉनवेला पहिल्या सामन्यातून आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूझीलंड संघासमोर दुखापतीचं सावट :

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सेंटनरने सांगितलं की मॅट हेनरी कनकशन टेस्टनंतर ठीक दिसतोय. मात्र डेवोन कॉनवेला लगेचच स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आले. दोन खेळाडूंमध्ये झालेली ही टक्कर अतिशय गंभीर वाटत होती. कॉनवेची अनुपस्थिती न्यूझीलंडसाठी एक मोठा धक्का आहे, कारण हा संघ आधीच अनेक खेळाडूंच्या दुखापतींशी संघर्ष करत आहे. आता या यादीत कॉनवेचाही समावेश झाला आहे. याआधी फलंदाज मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र हे अनुक्रमे हॅमस्ट्रिंग आणि खांद्याच्या दुखापतींमुळे वनडे सीरिजमधून बाहेर पडले होते.

हेही वाचा : हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार? बदल्यात मुंबई इंडियन्सला मिळणार दोन स्टार खेळाडू

डेवोन कॉनवेच्या जागी कोण खेळणार?

टिम सिफर्ट हा डेवोन कॉनवेच्या जागी खेळायला येऊ शकतो. टिम सिफर्ट याला आधी फक्त सुरुवातीच्या दोन वनडे सामन्यात खेळवण्याचा विचार केला जात होता, त्यांना सोमवारी संपूर्ण सीरिजसाठी न्यूझीलंड संघाचा भाग बनवण्यात आलं आहे. सँटनरने असे सूचित केले की, जर कॉनवे उपलब्ध नसेल, तर त्याच्या जागी सायफर्ट खेळू शकतो. सँटनर म्हणाला, 'हो, मला वाटते की आमच्या संघात सिफर्ट हा बॅक अप फलंदाज आहे. त्यामुळे, जर डेवोन कॉनवे उपलब्ध नसेल, तर सिफर्टला संधी मिळण्याची शक्यता आहे'.

भारत विरुद्ध न्यूझीलंड :

भारत विरुद्ध न्यूझीलंड - पहिला सामना - 4 नोव्हेंबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - दुसरा सामना - 7 नोव्हेंबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - तिसरा सामना - 10 नोव्हेंबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - चौथा सामना - 13 नोव्हेंबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - पाचवा सामना - 15 नोव्हेंबर 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES