• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /कुलदीप OUT, न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये गुरनूर बरारला संधी, BCCI ची मोठी घोषणा

कुलदीप OUT, न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये गुरनूर बरारला संधी, BCCI ची मोठी घोषणा

IND VS NZ Test : 19 नोव्हेंबर पासून दोन सामन्याच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार असून त्यापूर्वी टीम इंडियाच्या टेस्ट संघात बदल करण्यात आलेला आहे. यात कुलदीप यादवला बाहेर काढून गुरनूर बरारला संधी देण्यात आली आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 14, 2026, 11:38 AM IST|Updated: Nov 14, 2026, 12:39 PM IST
joinshare
कुलदीप OUT, न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये गुरनूर बरारला संधी, BCCI ची मोठी घोषणा
Image Credit: कुलदीप OUT, न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये गुरनूर बरारला संधी, BCCI ची मोठी घोषणा

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ Test : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून येथे ते न्यूझीलंड विरुद्ध टी20, वनडे आणि टेस्ट सीरिज  खेळत आहेत. टी20 नंतर आता वनडे सीरिज सुद्धा अंतिम टप्प्यात असून यातील फक्त शेवटचा पाचवा सामनाच शिल्लक आहे. त्यानंतर दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. असं असतानाच आता न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाच्या संघात बदल करण्यात आलेला आहे. 19 नोव्हेंबर पासून दोन सामन्याच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. याअंतर्गत वनडे सीरिजमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या गुरनूर बरारची निवड ही टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियात करण्यात आलेली आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.  

कुलदीप यादवच्या जागी गुरनूर बरारला न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी निवडलेल्या टीम इंडियाच्या संघात सामील करण्यात आले असल्याने तो आता शेवटचा वनडे सामना खेळणार नाही. तर कुलदीप यादव हा पुन्हा भारतात येऊन डोमेस्टिक क्रिकेट खेळेल. टीम इंडियासाठी एक चांगली गोष्ट अशी की  ऋषभ पंत सुद्धा टीम इंडियाशी जोडला गेला आहे. ऋषभ पंत हे अनेक आठवड्यांपासून दुखापतग्रस्त होता. नुकतंच त्याचा फिटनेस क्लीअरन्स मिळाली आहे.

कर्णधार शुभमन गिलने तीन वनडे सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर तो टेस्ट सीरिज खेळण्याच्या सरावासाठी सामील झाला आहे. त्यासोबत अंशुल कंबोज आणि केएल राहुल सुद्धा वनडे संघातून बाहेर पडून टेस्ट सीरिजसाठी सराव करत आहेत. गुरनूरने आतापर्यंत 13 वनडे सामन्यात एकूण 23 विकेट घेतले असून त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत आणलंय. आता त्यांना न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये सामील करण्यात आलं असून त्यांना टेस्ट सीरिजमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

Gurnoor Brar added to TeamIndia’s squad for NZvIND Tests More details on the squad updates  https://t.co/hYDKOnjK5e https://t.co/wz9kSubfzZ

BCCI (BCCI) November 14, 2026

टीम इंडियाचा टेस्ट संघ :

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयसवाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जड़ेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, गुरनूर बरार.

 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india