झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात 41 चेंडूंमध्ये नाबाद 91 धावांची खेळी केल्यानंतर, भारताची माजी कर्णधार हरमनप्रीत कौर मंगळवारी भावूक झाली. या सामन्यापूर्वीच्या सलग 10 सामन्यांत हरमनप्रीतला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. महिला टी-20 आशिया कप आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला चांगले यश मिळाले होते. मात्र हरमनप्रीतला फारसे यश मिळाले नव्हते. सामन्याच्या मध्यंतरावेळी बोलताना हरमनप्रीत म्हणाली, "खूप छान वाटतंय. मला फक्त खेळाचा आनंद घ्यायचा होता. मैदानावर मला पुरेसा वेळ मिळाला आणि मी खरोखरच खेळाचा आनंद घेतला."
हरमनप्रीत कौर नुकतंच भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाली आहे. तिने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडलं आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर खेळलेल्या पहिल्याच टी-20 मालिकेतील सामन्यात तिने तुफानी खेळी केली. झिम्बाब्वेविरोधातील सामन्यात तिने 41 चेंडूत 91 धावा केल्या. या खेळीनंतर समालोचकांशी संवाद साधताना हरमनप्रीतला अश्रू अनावर झाले होते. भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले डब्ल्यू. व्ही. रामन हे हरमनप्रीतशी बोलत असतानाच भावूक होऊन रडू लागली.
Why the arrogance from Harmanpreet Kaur or was it just tiredness after playing only 41 balls 🧐 Just look how Harman is talking, not even facing the camera 🤨 What's your take? https://t.co/zShXtsT7No
— Richard Kettlebourogh Fans (@RichKettle07) October 21, 2026
"मला फक्त आनंद लुटायचा आहे. मला जितका काळ जमेल तितका वेळ फलंदाजी करायची आहे आणि हे करणं मला जमत आहे याचा आनंद आहे. मी याचं श्रेय तुम्हालाही
(डब्ल्यू. व्ही. रामन) दिलं पाहिजे. आम्ही आलो त्याच क्षणी तुम्ही आला होतात आणि म्हणालात, ‘आता तुम्हाला जे करायचे आहे ते करा,’ आणि मला नेमके तेच करायचे आहे. मला खऱ्या अर्थाने आनंद घ्यायचा आहे. त्या शब्दांबद्दल धन्यवाद," असे ती म्हणाली.
हरमनप्रीतने आपल्या तुफानी खेळीत 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. तिने आपल्या या कामगिरीचे श्रेय नेट्समधील सरावाला दिले. हरमनप्रीत म्हणाली, "आशियाई खेळांनंतर मला नेट्समध्ये सराव करण्यासाठी काही वेळ मिळाला. मी हिमांशू भैया (फलंदाजी प्रशिक्षक) यांचे मनापासून आभार मानते, ज्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली आहे. आजची माझी फलंदाजी पूर्णपणे त्यांच्या मार्गदर्शनाचेच फळ आहे," असे तिने सांगितले.