स्मृती आणि हरमनप्रीतमध्ये बिनसलं? हॅन्डशेक प्रसंगानंतर सोशल मीडियावर चर्चा, VIDEO
मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर स्मृती आणि हरमनप्रीतमध्ये बिनसलं यासंदर्भात अनेक चर्चा पाहायला मिळाल्या. मालिकेच्या तिसरा झिम्बाब्वेविरुद्ध सामना झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघांची एकदिवसीय आणि टी20 मालिका पार पडली. या मालिकांमध्ये भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला. हरमनप्रीत कौरने कर्णधारपदावरुन पायउतार केल्यानंतर स्मृती मंधानाच्या हातात कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे. या दोन्ही मालिकेमध्ये मागील काही दिवसांपासून जेव्हापासून हरमनप्रीत कौरने कॅप्टन्सी सोडल्यानंतर हरमनप्रीत कौर स्मृती मंधाना यांच्यामध्ये सर्वकाही ठिक नाही असे पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर यासंदर्भात अनेक चर्चा पाहायला मिळाल्या. मालिकेच्या तिसरा झिम्बाब्वेविरुद्ध सामना झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत भारतीय महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली, परंतु मालिकेतील अंतिम सामन्यानंतर कर्णधार स्मृती मंधाना आणि वरिष्ठ फलंदाज हरमनप्रीत कौर यांच्यातील एक लहानशी घटना घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सामन्यानंतर प्रत्येक खेळाडू हा विरोधी संघाशी हॅन्डशेक करतो आणि स्वत:च्या संघाशी देखील हॅन्डशेक करतात. यावेळी हरमनप्रीत सध्याची कर्णधार स्मृतीकडे गेली, स्मृती दुसरीकडे पाहत असल्याचे दिसले आणि दोघींनी हॅन्डशेक केले नाही ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
हे ही वाचा
आधी शतक मग W, W, W, W, W, W... सरफराज खानचा धाकटा भावाची ऐतिहासिक कामगिरी! 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच
भारताची कर्णधार स्मृती मंधाना आणि वरिष्ठ फलंदाज हरमनप्रीत कौर ही संपूर्ण घटना केवळ काही सेकंदांची होती, परंतु भारतीय महिला क्रिकेटमधील दोन प्रमुख व्यक्तींचा यात समावेश असल्याने, या घटनेने सर्वत्र लक्ष वेधून घेतले. या घटनेनंतर, काही जणांनी दोन्ही खेळाडूंमध्ये मतभेद असल्याची शक्यता वर्तवायला सुरुवात केली. हरमनप्रीत आणि स्मृती यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. हरमनप्रीतने कर्णधारपद सोडल्यापासून आणि स्मृतीने नेतृत्व स्वीकारल्यापासून, त्या दोघांमध्ये मतभेद असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरची या मालिकेमध्ये प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या संघाने तिसऱ्या सामन्यामध्ये 8 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या संघाने टी20 मालिकेमध्ये 3-0 अशी स्मृती मंधानाच्या नेतृत्वात ही मालिका नावावर केली तर, एकदिवसीय मालिकेमध्ये स्वत:चा दबदबा दाखवला आणि मालिका 3-0 अशी जिंकून अनेक विक्रम नावावर केले आहेत. स्मृती मंधानाकडे बीसीसीआयने कर्णधारपद सोपवल्यानंतर मागील काही दिवसांपासून अनेक वाद पाहायला मिळाले आहेत. पण यावर कोणत्याही खेळाडूने किंवा बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्टपणे वक्तव्य केलेले नाही.