भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन तिने ही माहिती चाहत्यांना दिली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने क्रिकेटच्या इतिहासामध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारी भारतीय पहिली महिला कर्णधार आहे. मागील अनेक वर्षांपासून तिने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, हरमनप्रीत ही जगातील महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आज या लेखामध्ये हरमनप्रीत कौरच्या आलिशान लक्झरी लाईफस्टाईलबद्दल सांगणार आहोत.
जगामधील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौरचे देखील नाव आहे, मागील काही वर्षामध्ये तिने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. ती तिच्या चाहत्यांसोबत सोशल मिडियावर कुटुंबाचे आणि घराचे फोटो नेहमीच शेअर करत असते. नुकत्याच झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारतीय महिला संघाने गोल्ड मेडल जिंकले. हरमनप्रीत कौरने पंजाबमधील आपले मूळ गाव मोगाशी घट्ट नाते जपले आहे. मोगा हे ते छोटे शहर आहे जिथे हरमनप्रीतचा जन्म झाला, तिने आपले बालपण घालवले आणि पहिल्यांदा क्रिकेटची बॅट हातात घेतली. तिला मोगामध्ये आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडते.
वृतांच्या माहितीनुसार मोगा येथे हरमनप्रीत कौरचे घर आहे आणि या सुंदर घराची किंमत ही 80 लाख ते 1.5 कोटी रुपयांच्या दरामध्ये असण्याचा अंदाज आहे. हरमनप्रीत कौर आता ती कोट्यावधीची मालकीण असली तरी तिचे घर हे कोणत्याही दिखाऊपणापासून दूर आणि साधेपणाने राहणे पसंत करते. या घरातील खोल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र जमून वेळ घालवण्यासाठी पुरेशा प्रशस्त आहेत. घराची अंतर्गत रचना आधुनिक असली तरी, ती केवळ एक शोभेची वस्तू न वाटता, एक चैतन्यमय आणि प्रेमळ घर वाटावी अशा प्रकारे तयार केली आहे. कुटुंबातील सदस्यांना आराम करता यावा यासाठी, घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी भरपूर मोकळी जागा आहे.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला भारतीय संघासाठी पदार्णण करण्याची संधी 2009 मध्ये मिळाली होती. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये तिला भारतासाठी पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली होती. हरमनप्रीत कौरची कारकीर्द कर्तृत्वाने परिपूर्ण राहिली आहे. 2017 च्या महिला विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने केलेली अविस्मरणीय नाबाद 171 धावांची खेळी कोण विसरू शकेल? टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 200 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती पहिली महिला असून, एकूण 356 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह ती सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 मध्ये आपले पहिले एकदिवसीय महिला विश्वचषक विजेतेपद पटकावले.