सलग दुसऱ्या विजयानंतर 'या' 3 खेळाडूंचा फॅन झाला हेड कोच गौतम गंभीर, तीन शब्दात केली पोस्ट
Gautam Gambhir : न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळाल्यावर हेड कोच गौतम गंभीरने खेळाडूंची तारीफ केली. एक फोटो शेअर करून गौतम गंभीरने केवळ 3 शब्दांचे कॅप्शन दिले.
Gautam Gambhir : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने 4 विकेट्सने विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला आणि अखेरीस भारताचा विजय झाल्याने फॅन्स सह हेड कोच गौतम गंभीर सुद्धा खुश झाला. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळाल्यावर हेड कोच गौतम गंभीरने खेळाडूंची तारीफ केली. नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा आणि नमन धीर यांचे फोटो शेअर करून गौतम गंभीरने केवळ 3 शब्दांचे कॅप्शन दिले. या तिघांनी जबरदस्त परफॉर्मन्स करून दुसऱ्या टी20 मध्ये भारताला विजय मिळवून दिला. ज्यात एकवेळ न्यूझीलंडचं पारडं जड वाटत होतं.
शनिवारी खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि गोलंदाजी निवडली. ग्लेन फिलिप्स (70) आणि बेवॉन जॅकब्स (58) मध्ये अर्धशतकीय खेळी करून संघाची धावसंख्या 180 पर्यंत पोहोचवली. भारताने विजयासाठी 181 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ हा 70 धावांवर बॅड झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. टीम इंडियाचा पराभव अतिशय जवळ दिसत होता. मात्र नमन धीर, तिलक वर्मा आणि नितीशकुमार रेड्डी यांनी बाजी पलटली आणि गौतम गंभीरने त्याच्या अंदाजात खेळाडूंची तारीफ केली.
हेही वाचा : IPL 2027 साठी संघांनी बदलले हेड कोच, जाणून घ्या सर्व 10 संघांच्या हेड कोचची नाव एका क्लिकवर
गौतम गंभीरने असं केलं कौतुक :
संजू सॅमसन (14), अभिषेक शर्मा (27), वैभव सूर्यवंशी (4), श्रेयस अय्यर (7) आणि अक्षर पटेलच्या रूपात टीम इंडियाचे टॉप-5 फलंदाजा 70 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी 42 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ज्यामध्ये नमनने 17 बॉल अबू 3 सिक्स सह 31 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेला नितीश कुमार रेड्डी शेवटपर्यंत तिलकच्या सोबतीला राहिला आणि एक बॉल शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला.
तिलक वर्माने 26 बॉल 51 धावा केल्या तर नितीश कुमार रेड्डीने 13 बॉल 26 धावा केल्या. या खेळाडूंचा फोटो शेअर करत गौतम गंभीरने 'एक्स' वर लिहिले 'Boys Becoming Men'. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा सामना हा मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.