IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. या सामन्याचा टॉस भारताने जिंकला असून यात त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल झाला आहे. ईशान किशनला दुखापत झाल्याने तो दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या बदल्यात वैभव सूर्यवंशीला संघात संधी देण्यात आली आहे.
6 सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीचं पुनरागमन :
क्राइस्टचर्चमध्ये शनिवार 24 ऑक्टोबर रोजी टी20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचं टीम इंडियटच्या प्लेईंग 11 मध्ये पुनरागमन झालं आहे. जवळपास 6 टी20 सामन्यानंतर वैभव सूर्यवंशाला संधी देण्यात आलेली नव्हती. 15 वर्षांच्या वैभवचे फॅन्स त्याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी उत्साहित होते. ईशान किशनच्या दुखापतीमुळे वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. वैभव सूर्यवंशीने भारताकडून शेवटचा सामना हा एशियन गेम्स 2026 मध्ये खेळवला पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. मात्र वैभव सलामीला फलंदाजी करणार नाही ही जबाबदारी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सांभाळणार आहेत. वैभव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल ज्या क्रमांकावर सहसा इशान किशन फलंदाजी करतो. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट अशा दोन्ही स्तरांवर, वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून नव्हे, तर वेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.
टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये किती बदल झाले?
दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग 11 मध्ये दोन बदल झालेत. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. वैभवसोबतच वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवचे संघात पुनरागमन झाले आहे; मागील सामन्यात त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. तो मयांक यादवची जागा घेईल, ज्याला या सामन्यातून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघातही एक बदल झाला आहे; वेगवान गोलंदाज जेकब डफीचा संघात समावेश करण्यात आला असून, त्याने ॲडम मिल्नेची जागा घेतली आहे
भारताची प्लेईंग 11 :
संजू सॅमसन (विकेटकिपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव
न्यूझीलंडची प्लेईंग 11 :
फिन ॲलन, टिम सायफर्ट (विकेटकिपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हन जेकब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन