SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल, वैभव सूर्यवंशीला मिळालं स्थान, पाहा अजून कोण कोण संघात?

IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळवला गेला. भारताने टॉस जिंकल्यावर कर्णधार श्रेयस अय्यरने टीम इंडियाची बदललेली प्लेईंग जाहीर केली.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 24, 2026, 12:37 PM IST | Updated: Oct 24, 2026, 01:21 PM IST
Image Credit: टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल, वैभव सूर्यवंशीला मिळालं स्थान, पाहा अजून कोण कोण संघात?
Join

IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना 24 ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. या सामन्याचा टॉस भारताने जिंकला असून यात त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल झाला आहे. ईशान किशनला दुखापत झाल्याने तो दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या बदल्यात वैभव सूर्यवंशीला संघात संधी देण्यात आली आहे.

6 सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीचं पुनरागमन :

क्राइस्टचर्चमध्ये शनिवार 24 ऑक्टोबर रोजी टी20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचं टीम इंडियटच्या प्लेईंग 11 मध्ये पुनरागमन झालं आहे. जवळपास 6 टी20 सामन्यानंतर वैभव सूर्यवंशाला संधी देण्यात आलेली नव्हती. 15 वर्षांच्या वैभवचे फॅन्स त्याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी उत्साहित होते. ईशान किशनच्या दुखापतीमुळे वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. वैभव सूर्यवंशीने भारताकडून शेवटचा सामना हा एशियन गेम्स 2026 मध्ये खेळवला पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. मात्र  वैभव सलामीला फलंदाजी करणार नाही ही जबाबदारी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सांभाळणार आहेत. वैभव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल ज्या क्रमांकावर सहसा इशान किशन फलंदाजी करतो. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट अशा दोन्ही स्तरांवर, वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून नव्हे, तर वेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये किती बदल झाले?

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग 11 मध्ये दोन बदल झालेत. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. वैभवसोबतच वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवचे संघात पुनरागमन झाले आहे; मागील सामन्यात त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. तो मयांक यादवची जागा घेईल, ज्याला या सामन्यातून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघातही एक बदल झाला आहे; वेगवान गोलंदाज जेकब डफीचा संघात समावेश करण्यात आला असून, त्याने ॲडम मिल्नेची जागा घेतली आहे

भारताची प्लेईंग 11 : 

संजू सॅमसन (विकेटकिपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव

न्यूझीलंडची प्लेईंग 11 : 

फिन ॲलन, टिम सायफर्ट (विकेटकिपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हन जेकब्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES