पावसामुळे तिसऱ्या सामन्यावर पाणी फेरलं! भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द करण्याची वेळ, क्रिकेट प्रेमींची निराशा
IND VS NZ 3rd Match ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या वनडे सीरिजमधील तिसरा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे आता न्यूझीलंडला भारताविरुद्ध या सीरिजमध्ये आघाडी घेता येणार नाही.
IND VS NZ 3rd Match ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवण्यात येत आहे. या वनडे सीरिजचा तिसरा सामना हा 10 नोव्हेंबर रोजी सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळवला जाणार होता. मात्र सामना सुरु होण्याच्या आधीपासूनच पाऊस व्यत्यय आणत असल्याने अखेर हा सामना रद्द करण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे पाच सामन्यांच्या या सीरिजमध्ये भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 ने आघाडी घेतली होती. जर का आजचा सामना झाला असता तर यात न्यूझीलंडला भारतावर मात करून सीरिजमध्ये पुढील सलग तीन सामने जिंकून सीरिज जिंकण्याची संधी होती. मात्र आता न्यूझीलंड उर्वरित दोन्ही सामने जिंकून भारताशी केवळ बरोबरी करू शकते ते आघाडी घेऊ शकणार नाहीत. सामना रद्द झाल्याने अनेक प्रेक्षक नाराज झाले.
टीम इंडिया सीरिजमध्ये पराभूत होणार नाही :
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा सामना रद्द झाल्याने याचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. आता हा सामना रद्द झाल्याने सीरिजमध्ये भारताचा पराभव होईल ही शक्यता आता पूर्णपणे टळली आहे. भारताने आधीच न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या सीरिजपैकी दोन सामने जिंकलेत. त्यामुळे यजमान न्यूझीलंडला ही सीरिज जिंकायची होती तर त्यासाठी त्यांना तिसरा, चौथा आणि पाचवा सामना जिंकणं महत्वाचं होतं. मात्र आता तसं होऊ शकणार नाही. न्यूझीलंडचा संघ पुढील दोन सामने जिंकून भारतासोबत सीरिजमध्ये बरोबरी साधू शकते, मात्र ते ही सीरिज आघडी घेऊन जिंकू शकत नाहीत.
हेही वाचा : जानेवारीमध्ये IPL खेळवण्याची मागणी, KKR ची मालकीण जुही चावलाने केली पोस्ट
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिज :
भारतीय संघ :
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, अंशुल कंबोज, औकिब नबी, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड़, मोहम्मद सिराज, ईशान किशन, कुलदीप यादव.
न्यूझीलंडचा संघ :
विल यंग, टिम सीफर्ट, हेनरी निकोल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिशेल सैंटनर (कर्णधार), नाथन स्मिथ, काइल जैमीसन, जैकब डफी, मैथ्यू फिशर, क्रिस्टियन क्लार्क, माइकल ब्रेसवेल, निक केली.
पहिले दोन वनडे भारताने जिंकले :
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरुवातीच्या दोन सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे अत्यंत चुरशीचे विजय मिळवले. सीरिजमधील पहिल्या वनडे सीरिजमधील पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रभावित झाला. यात भारतने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज असघ दोघांनी देखील केलेल्या चांगल्या कामगिरीने न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय मिळवण्यात भारतीय संघाला यश आले.