• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यावर पावसाचं संकट, वेलिंग्टनमधील हवामानाचा मॅचवर कसा होणार परिणाम?

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यावर पावसाचं संकट, वेलिंग्टनमधील हवामानाचा मॅचवर कसा होणार परिणाम?

IND VS NZ 3rd Match Weather Reports : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी20 सामना मंगळवारी होणार आहे. मात्र वेलिंग्टनमधील हवामान दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा वेलिंग्टनमधील हवामान कसं आहे याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Oct 27, 2026, 09:51 AM IST|Updated: Oct 27, 2026, 10:43 AM IST
joinshare
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यावर पावसाचं संकट, वेलिंग्टनमधील हवामानाचा मॅचवर कसा होणार परिणाम?
Image Credit: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यावर पावसाचं संकट, वेलिंग्टनमधील हवामानाचा मॅचवर कसा होणार परिणाम?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज सुरु असून यातील तिसरा सामना हा 27 ऑक्टोबर मंगळवारी वेलिंग्टन येथे होणार आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त परफॉर्मन्स देऊन सामने जिंकले. हे दोन्ही सामने क्राइस्टचर्च येथे झाले, मात्र आता वेलिंग्टनमधील मैदानावर टीम इंडियाला खेळ कसा असणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. ही सीरिज जरी पाच सामन्यांची असली तरी आधीचे दोन सामने जिंकल्याने भारताला तिसरा सामना जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडने हा सामना जिंकल्यास ते सीरिजमध्ये पुनरागमन करू शकतात. मात्र वेलिंग्टनमधील हवामान हे दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

कसं असणार हवामान?

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी की पावसामुळे सामना विस्कळीत होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. वेलिंग्टनमध्ये मंगळवारी सकाळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला, तरी संध्याकाळी सामना सुरू होईपर्यंत हवामान पूर्णपणे निरभ्र होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. वेलिंग्टनचे प्रसिद्ध जोरदार वारे शांत असतील परंतु खेळाडूंना तीव्र थंडीचा सामना करावा लागेल.

कसं असणार सामन्याच्या दरम्यानचं तापमान?

सामन्यादरम्यान तापमान 9 से 12अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. जर पाऊस पडला तर 'डकवर्थ-लुईस' नियमानुसार निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांना किमान प्रत्येकी 5-5 ओव्हर खेळणे आवश्यक असेल. जर सामना रद्द झाला तर त्याचा फायदा भारताला होईल, कारण सीरिज गमावण्याचा धोका पूर्णपणे टळेल.

हेही वाचा : IPL 2027 पूर्वी CSK मध्ये मोठे बदल, मायकल हसी सह 5 कोचने सोडला संघ

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी20 सामना हा मंगळवार 27 ऑक्टोबर 2026 रोजी सुरु होणार आहे. वेलिंग्टनमधील स्काय स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सीरिजचं वेळापत्रक :

भारत विरुद्ध न्यूझीलंड - तिसरा सामना - 27ऑक्टोबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - चौथा सामना - 30 ऑक्टोबर 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - पाचवा सामना - 1 नोव्हेंबर

भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकिपर), टिळक वर्मा (उपकर्णधार कर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरूण कुमार, वरूण कुमार, अभिषेक शर्मा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News
Marathi News