मालिकेच्या झालेल्या दुसऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील रोमांचक सामन्यात भारताच्या संघाने प्रसिद्ध विजय मिळवला आणि मालिकेमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. भारताच्या संघासमोर दुसऱ्या सामन्यामध्ये 180 धावांचे लक्ष्य होते या सामन्यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज टीम इंडियाचे बाद झाल्यानंतर तिलक वर्मा, नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या खेळीने भारताच्या संघाला या मालिकेचा महत्त्वाचा विजय मिळवून दिला होता. इशान किशन दुसऱ्या सामन्यामध्ये जखमी होता त्यामुळे तो प्लेइंग 11 चा भाग नव्हता त्याच्या जागेवर वैभव सूर्यवंशीला भारतीय संघामध्ये स्थान मिळाले होते. आता तिसरा सामन्यामध्ये भारताच्या संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे, त्यामुळे टीम इंडिया सर्वात्तम 11 खेळाडू मैदानामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतील.
दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाला तिसरा सामना हा करो या मरो असणार आहे, जर घरच्या मैदानावर सुरु असलेल्या मालिकेमध्ये किवी संघाला विजय टिकवून ठेवायचा असल्यास तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवावा लागणार आहे. मागील दोन सामन्यांमध्ये एकही सामन्यात वरुण चक्रवर्तीला खेळण्याची संधी मिळाली नाही, तर इशान किशन हा तंदुरुस्त आहे की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. इशान किशनच्या जागेवर प्लेइंग 11 मध्ये वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली होती पण तो त्याचा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला.
हे ही वाचा
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे. पुनरागमनानंतर भुवनेश्वर कुमारचे दोन्ही सामने निराशाजनक ठरले आहेत. त्याने पहिल्या टी-20 सामन्यात 49 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 50 धावा दिल्या. भुवनेश्वर कुमारला या दोन सामन्यांत केवळ एकच बळी मिळवता आला. परिणामी, त्याच्या जागी मयंक यादवला संघात स्थान दिले जाऊ शकते. पण त्याला असलेल्या अनुभवामुळे त्याला संघामध्ये कायम ठेऊ शकतात. रणनीतीचा भाग म्हणून मयंकला दुसऱ्या टी-20 सामन्यातून वगळण्यात आले होते आणि तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी त्याचे पुनरागमन होऊ शकते.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), वैभव सूर्यवंशी/वरूण चक्रवर्ती, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव.