चौथ्या वनडे सामन्यात भारताची प्लेईंग 11 पूर्णपणे बदलणार, शुभमन गिल आणि केएल राहुल होणार बाहेर
IND VS NZ 4th ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १३ नोव्हेंबर रोजी चौथा वनडे सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल होणार आहेत. तेव्हा हे बदल नेमके कोणते याविषयी जाणून घेऊयात.
IND VS NZ 4th ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामान्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा 13 नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुई येथे खेळवला जाईल. या सीरिजमधील सुरुवातीचे दोन सामने हे भारताने जिंकले तर तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे सध्या टीम इंडिया सीरिजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. मात्र आता सीरिजमधील उर्वरित दोन सामन्यांसाठी टीम इंडियात मोठे बदल होणार आहेत. यात टीम इंडियाचा कर्णधार बदलणार असून संघाचं नेतृत्व हे श्रेयस अय्यरकडे करेल तर केएल राहुल सुद्धा उर्वरित दोन सामन्यांच्या प्लेईंग 11 चा भाग नसेल.
कोण IN कोण OUT?
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ऑक्टोबर महिन्यापासून असून येथे ते पाच सामन्यांची टी20, पाच सामन्यांची वनडे तर दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. आता पाच सामन्यांच्या वनडे सीरिजमधील उर्वरित दोन सामन्यात टीम इंडियाचे तीन खेळाडू दिसणार नाहीत. यात कर्णधार शुभमन गिल, स्टार विकेटकिपर फलंदाज केएल आणि वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यांचा समावेश होता. तिलक वर्माचा वनडे संघात समावेश करण्यात आला असून, कुमार कुशाग्रालाही संघात स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजच्या जागी वेगवान गोलंदाज यश ठाकूरला वनडे संघात समाविष्ट करण्यात आले आहे. आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर, चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी एक स्वतंत्र संघ निवडण्यात आला आहे.
रोहित आणि ऋतुराज करणार ओपनिंग?
चौथ्या वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि रोहित शर्मा हे दोघे इनिंगची सुरुवात करू शकतात. केएल राहुलच्या जागी ईशान किशन हा विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळतील. विराट कोहलीचं तिसऱ्या आणि श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकावर खेळणं निश्चित आहे. याशिवाय गोलंदाजीत एक बदल होणार आहे. ते म्हणजे अंशुल कंबोज ऐवजी यश ठाकुर किंवा कुलदीप यादवला प्लेईंग ११ मध्ये सामील केलं जाऊ शकतं.
हेही वाचा : जानेवारीमध्ये IPL खेळवण्याची मागणी, KKR ची मालकीण जुही चावलाने केली पोस्ट
चौथ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
ऋतुराज गायकवाड़, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, अक्षर पटेल, आकिब नबी डार, कुलदीप यादव/यश ठाकुर, गुरनूर बराड़ आणि अर्शदीप सिंह.
चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, नमन धीर, ऋतुराज गायकवाड़, अक्षर पटेल, ईशान किशन (विकेटकीपर), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), आकिब नबी डार, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, यश ठाकुर आणि कुलदीप यादव