SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IND vs NZ चौथ्या सामन्यात पाऊस खेळ खराब करणार, कसे असेल सामन्यादरम्यान हवामान?

आता भारताच्या संघाला चौथ्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे त्याआधी बे ओव्हल येथील हवामान कसे असणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 12, 2026, 03:11 PM IST | Updated: Nov 12, 2026, 03:39 PM IST
Join

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे सामना रद्द करण्यात आला होता. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तर मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाला चौथ्या सामन्यामध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे. न्यूझीलंडच्या संघ या मालिकेमध्ये उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर मालिका बरोबरीत संपेल. आता भारताच्या संघाला चौथ्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे त्याआधी बे ओव्हल येथील हवामान कसे असणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.

एकदिवसीय मालिकेमध्ये न्यूझीलंडच्या संघाची खराब फलंदाजी पाहायला मिळाली. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळत आहे त्यामुळे मग गोलंदाजांची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर या मालिकेवर हवामानाचाही परिणाम झाला आहे कारण ढगाळ वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांना मदत पाहायला मिळत आहे, चौथ्या सामन्यामध्ये सामन्यादरम्यान हवामान कसे असणार यासंदर्भात सविस्तर वाचा.

हे ही वाचा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर अखेर विवाहबंधनात अडकले; पहिली झलक व्हायरल

कसे असेल सामन्यादरम्यान हवामान?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2026 रोजी बे ओव्हल येथे होणाऱ्या सामन्यादरम्यान हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. या दिवशी पावसाची 10 टक्के शक्यता असल्याने, सामना पूर्णपणे खेळला जाण्याची दाट शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत एकही 50 षटकांचा एकदिवसीय सामना खेळला गेलेला नाही, परंतु येथे एक पूर्ण 50 षटकांचा सामना अपेक्षित आहे. शुक्रवारी कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून, रात्री ते 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

चौथ्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. शुभमन गिल हा कसोटी मालिकेची तयारी करत आहे त्यामुळे त्यामुळे तो चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये खेळणार नाही. त्याच्या जागी एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करेल. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने यापूर्वी टी-20 मालिका 3-2 ने जिंकली होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES