IND vs NZ: नितीश रेड्डीच्या सिक्सवर फिदा झाली महिला चाहती, बॉलला Kiss करून पुन्हा मैदानात फेकलं, Video Viral
IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा सामना हा शुक्रवारी पार पडला. या सामन्यात नितीश कुमार रेड्डीने मारलेल्या एका सिक्सला पाहून महिला चाहती उत्साहात बेभान झाली आणि तिने स्टॅन्डमध्ये पडलेल्या बॉलला किस करून तो पुन्हा मैदानात फेकला.
IND VS NZ T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजमधील तीन सामन्यात भारताने विजय मिळवला तर चौथा सामना हा न्यूझीलंडने जिंकला. त्यामुळे सीरिज सध्या 3 -1 अशी आहे. ज्यात भारताने विजयी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा सामना हा शुक्रवारी पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाज नितीश कुमार रेड्डीने 21 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने दोन सिक्स ठोकले. यावेळी त्यातील एक सिक्स हा थेट स्टॅन्डमध्ये गेला आणि यावेळी एका महिला चाहतीने त्या बॉलला किस घेतले आणि तो मैदानात टाकला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑकलंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी20 सामन्यात, भारतीय इनिंग दरम्यान अशीच एक घटना पाहायला मिळाली. ही घटना नितीश रेड्डी फलंदाजी करत असताना घडली. जरी नितीशला फलंदाजीमध्ये फारशी मोठी कामगिरी करता आली नाही, तरी त्याने मारलेल्या एका सिक्सवर स्टेडियममधील एका महिला चाहत्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली.
सुंदर चाहतीने बॉलला केलं किस :
नितीश कुमार रेड्डीने जसा न्यूझीलंडच्या गोलंदाजाच्या बॉलवर सिक्स लगावला आणि बॉल स्टॅन्डमध्ये पोहोचला. यावेळी महिला चाहतीने तो बॉल पकडला आणि त्याला किस केले. किस केल्यावर महिला चाहतीने तो बॉल पुन्हा मैदानात टाकला. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आणि त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. नितीश कुमार रेड्डीने या सामन्यात 10 बॉलमध्ये 21 धावा ठोकल्या, त्यावेळी नितीशने एकूण 2 सिक्स मारले.
टीम इंडियाचा सीरिजमधील पहिला पराभव :
न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 सीरिजमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना, ग्लेन फिलिप्स आणि मायकेल ब्रेसवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये एकूण 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ केवळ 172 धावा करू शकला, ज्यामुळे त्यांना 87 धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र सलग तीन सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाने सीरिजमध्ये विजयी आघाडी घेतली होती जी प्रतिस्पर्धी संघाला ओलांडणे अशक्य होते.