आकिब नबीची टीम इंडियात निवड! 2 ऐवजी आता 5 वनडे खेळणार, पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ
IND VS NZ ODI : भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा अद्याप दुखापतीतून बरा झालेला नाही. तेव्हा त्याच्या ऐवजी आकिब नबीची निवड करण्यात आली असून त्यामुळे आता भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमधील सर्व सामन्यांसाठी आकिब नबी हा उपलब्ध असेल.
IND VS NZ ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 4 नोव्हेंबर पासून वनडे सीरिज खेळवली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमध्ये आकिब नबीला संधी देण्यात आली असून यापूर्वी आकिब नबी याला फक्त दोन सामन्यांसाठी संघात सामील करण्यात आले होते. मात्र आता या सीरिजच्या सुरुवातीच्या सामन्यापासून तो उपलब्ध असेल.
तसं पाहायचं झालं तर तांत्रिकदृष्ट्या प्रसिद्धच्या जागी आकिब नबी हा थेट अधिकृत पर्याय आहे असं म्हणता येणार नाही. कारण आकिब नबीचा आधीच वनडे संघात समावेश होता. मात्र आता तो शेवटच्या दोन सामन्यांऐवजी पहिल्या तीन सामन्यांसाठी सुद्धा संघासोबत असेल, म्हणजेच तो एक प्रकारे प्रसिद्ध कृष्णाची जागा घेईल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान गुवाहाटी येथे झालेल्या एका सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यातून अद्याप तो पूर्णपणे रिकव्हर होऊ शकलेला नाही.
न्यूझीलंडच्या दौऱ्यावर भारतीय संघाला पाच सामन्यांची सीरिज खेळायची आहे. वनडे सीरिजच्यानंतर दोन टेस्ट सामने खेळले जाणार आहे. हेच कारण आहे की वनडे संघाला दोन भागात विभागण्यात आलं. कारण वनडे सीरिजनंतर लगेचच टेस्ट सीरिज सुद्धा भारतीय संघाला खेळायची आहे. तेव्हा खेळाडूंचं वर्क लोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : रोहित शर्माने का निवडली 45 नंबरची जर्सी? आई आणि राहुल द्रविडशी आहे खास कनेक्शन, स्वतः सांगितला किस्सा
पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह, ईशान किशन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी (फक्त पहिल्या वनडेसाठी), आकिब नबी.
चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर, उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंह, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.