IND VS NZ ODI Series : सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी20 सीरिज खेळवली जात आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. मात्र या सीरिजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून या सीरिजमधून भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा बाहेर पडला आहे. यापूर्वी असं बोललं जातं होतं की प्रसिद्ध कृष्णा हा सीरिजच्या अंतिम दोन सामन्यात खेळू शकतो. मात्र आता यावर पूर्णविराम लागला आहे. याशिवाय नितीश कुमार रेड्डी ज्याला पाच सामन्यांसाठी निवडण्यात आलं होतं. आता तो फक्त एक सामना खेळणार आहे. क्रिकेबझच्या रिपोर्टनुसार प्रसिद्ध कृष्णाच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आलेली नाही. प्रसिद्धला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.
न्यूझीलंडच्या विरुद्ध वनडे सीरिजसाठी जेव्हा संघाची घोषणा करण्यात आली प्रसिद्ध कृष्णाला संघात सहभागी करण्यात आलेलं होतं. मात्र वेळेत त्याची दुखापत पूर्ण न झाल्याने तो संघातून बाहेर पडला आहे. आनंदाची बातमी अशी की तो न्यूझीलंड 'ए' विरुद्धच्या तिसऱ्या अनऑफिशियल टेस्ट सामन्यासाठी 'इंडिया ए' संघात सामील होईल. मात्र टेस्ट सीरिजचा विचार करता प्रसिद्ध कृष्णाला 'रिटर्न-टू-प्ले' चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
नितीश रेड्डी आता फक्त एक सामन्यात खेळणार :
प्रसिद्ध कृष्णा ऐवजी नितीश कुमार रेड्डीबाबत आता अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे. नितीश कुमार रेड्डी आता टीम इंडियासाठी न्यूझीलंड विरुद्ध सर्व वनडे सामने खेळणार नाही. सुरुवातीला त्याला संपूर्ण मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु आता 4 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यानंतर तो 'इंडिया ए' संघात सामील होईल. 'इंडिया ए' आणि 'न्यूझीलंड ए' यांच्यातील तिसरा अनऑफिशियल टेस्ट सामना 6 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाने नितीश रेड्डीला तयार करण्यास सुरुवात केली आहे.
वनडे सीरिजसाठी भारतीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, रुतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, ईशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी.
चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बराड़, रुतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.