SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IND vs NZ: संपूर्ण सीरिजमधून बाहेर पडला स्टार फलंदाज, प्रॅक्टिस दरम्यान झालेली दुखापत, संघाचं टेन्शन वाढलं

IND VS NZ Devon Conway Health Updates : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वनडे सीरिजमधून स्टार फलंदाज बाहेर पडला आहे. डोक्याला लागेलेल्या दुखापतीच्या कारणामुळे स्टार फलंदाज बाहेर पडला असून त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा सुद्धा झाली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 06, 2026, 11:57 AM IST | Updated: Nov 06, 2026, 12:39 PM IST
Image Credit: संपूर्ण सीरिजमधून बाहेर पडला स्टार फलंदाज, प्रॅक्टिस दरम्यान झालेली दुखापत, संघाचं टेन्शन वाढलं
Join

IND VS NZ Devon Conway Health Updates : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना 7 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज संपूर्ण सीरिजमधून बाहेर पडला आहे. डेवोन कॉनवे हा पहिल्या सामन्यात सुद्धा खेळला नव्हता. पहिल्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान मॅट हेनरीची टक्कर झाल्याने डेवोन कॉनवेच्या डोक्याला दुखापत झालेली. त्यानंतर त्याला रुग्णालयात स्कॅनसाठी नेण्यात आले. मॅट हेन्री मेंदूला झालेल्या दुखापतीतून सावरला असून, त्याला खेळण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

कोणाला मिळाली डेवोन कॉनवेची जागा?

डेवोन कॉनवेच्या दुखापतीनंतर अधिक फक्त चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघात निवडण्यात आलेल्या निक केलीला आता कॉनवेची रिप्लेसमेंट म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. तो वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड संघात सामील झाला आहे. या शनिवारी सुरू होणाऱ्या, भारत 'अ' विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम अनधिकृत टेस्ट सामन्यासाठी केली 'न्यूझीलंड 'अ' संघात होता. परिणामी त्याच्या जागी ऑकलंडचा फलंदाज डेल फिलिप्सला 'न्यूझीलंड 'अ' संघात बोलावण्यात आले आहे.

हेही वाचा : जगातील एकमेव गोलंदाज, ज्याच्या विरुद्ध सचिन तेंडुलकर एकही धाव करू शकला नाही

रचिन रवींद्र आणि चॅम्पमॅन बाहेर :

न्यूझीलंड क्रिकेट संघ यावेळी आपल्या खेळाडूंच्या दुखापतीशी झुंज देत आहे. ऑलराऊंडर मार्क चॅम्पमॅन  आणि स्टार फलंदाज रचिन रवींद्र सुद्धा यावेळी वनडे सीरिजचा भाग नाहीत. खांद्याच्या दुखापतीमुळे त्यालाही सीरिजच्या अगदी सुरुवातीच्या आधी माघार घ्यावी लागली. याशिवाय 'न्यूझीलंड ए'संघातही दोन अनिवार्य बदल करावे लागले आहेत. वेगवान गोलंदाज सायमन कीन, बेन लिस्टर आणि फ्रेझर शीट हे दुखापतींमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यांना या दुखापती 'इंडिया ए' विरुद्धच्या अनधिकृत सामन्यादरम्यान झाल्या. हे खेळाडू सध्या सुरू असलेल्या सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत होते. त्यांनी प्रत्येकी 6 विकेट घेतले होते.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES