SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

श्रीलंका सीरिजसाठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाचं सिलेक्शन, हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचं लक्ष

IND VS SL : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात डिसेंबर महिन्यात वनडे आणि टी20 सीरीज खेळवली जाणार आहे. तेव्हा या सीरिजसाठी बीसीसीआयची सिलेक्शन कमिटी लवकरच भारतीय संघाची घोषणा करणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 28, 2026, 20:43 IST | Updated: Nov 28, 2026, 21:12 IST
Image Credit: श्रीलंका सीरिजसाठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाचं सिलेक्शन, हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचं लक्ष
Join

IND VS SL : टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा आता लवकरच संपणार आहे. टीम इंडियाच्या या न्यूझीलंड दौऱ्यात दोन्ही संघात टी20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळवली गेली. टेस्ट सीरिजमधील दुसरा आणि शेवटचा सामना आता संपण्याच्या मार्गावर असताना त्यानंतर टीम इंडिया मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि वनडे सीरिज खेळेल. डिसेंबर महिन्यात भारतीय संघ श्रीलंके विरुद्ध वनडे आणि टी20 सीरीज खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाची निवड ही रविवार 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सीरिजसाठी श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. या सीरिजमध्ये तीन वनडे सामने आणि तितकेच टी20 सामने सुद्धा खेळवले जातील. पहिल्यांदा दोन्ही संघात वनडे सीरिज डिसेंबर महिन्यात खेळवली जाईल. 13 डिसेंबरला टी20 सीरिजच्या सामन्यांना सुरुवात होईल. त्यानंतर तीन सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जाईल.

कोणत्या खेळाडूंवर असणार नजर?

दोन्ही सीरिजसाठी रविवारी 29 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयची सिलेक्शन कमिटी संघाची निवड करणार असून मुख्य निवडकर्ता प्रज्ञान ओझा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ निवड समितीसमोर एकदिवसीय मालिकेसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे आव्हान असेल. यातील सर्वात कळीचा प्रश्न हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीबाबत आहे. हार्दिक पांड्या एकदिवसीय किंवा टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तंदुरुस्त आहे का? 2026 च्या आयपीएलनंतर हार्दिकने कोणताही क्रिकेट सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत, 2027 च्या वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने ही सीरिज अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.

तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांना वनडे सीरिजमध्ये संधी मिळणे हे मुद्दे महत्वाचे ठरतील. बुमराहला विश्रांती दिली जाईल का आणि न्यूझीलंड दौऱ्यावर केवळ एक वनडे सामना खेळलेला सिराज या फॉरमॅटसाठी पुन्हा निवडला जाईल का, हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. याव्यतिरिक्त हर्षित राणाचे वरिष्ठ संघात पुनरागमन होईल का हे पाहणेही बाकी आहे.

हेही वाचा : 'मी तयार नव्हतो.... अंबानी सोबत बोलणं झालं', मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यावर रोहित शर्माचा खुलासा

भारत विरुद्ध श्रीलंका वनडे आणि टी20 सीरिज :

13 डिसेंबर - पहिला वनडे , विशाखापत्तनम

16 डिसेंबर - दुसरा वनडे , बंगळुरू

19 डिसेंबर - तीसरा वनडे , अहमदाबाद

22 डिसेंबर - पहिला टी20, राजकोट

24 डिसेंबर - दुसरा टी20, कटक

27 डिसेंबर - तीसरा टी20, पुणे

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES