Rohit Sharma Captain Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आगामी आयपीएल 2027 साठी कर्णधार म्हणून रोहित शर्माची घोषणा केली आहे. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याकडे मुंबईने संघाचं कर्णधारपद सोपवलं होतं आणि 5 ट्रॉफी जिंकावणाऱ्या कर्णधार रोहितकडून संघाचं नेतृत्व काढून घेतलं होतं. 27 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी रोहित शर्माच्या नावाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माने सांगितलं की आकाश अंबानी यांची भेट घेतल्यावर त्याने पुन्हा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याबाबत विचार केला. रोहित म्हणाला की सुरुवातीला तो यासाठी तयारच नव्हता. रोहितने याबाबत आपल्या पत्नीशी सुद्धा बातचीत केली.
मुंबई इंडियन्सने या मुलाखतीत म्हटलं की, 'मी माझ्या पत्नीसोबत या विषयावर चर्चा करत होतो. आकाश अंबानींचा मला फोन आला. त्यानंतर आम्ही मिळून चर्चा केली की, संघाला पुढे नेण्यासाठी काय करता येईल. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा केली'.
सुरुवातीला नेतृत्व करण्यासाठी तयार नव्हता रोहित :
रोहित शर्माने पुढे मुलाखतीत म्हंटलं की, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर, सुरुवातीला मला असे वाटले की मी पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्यास तयार नाही. मला मागे वळून त्या गोष्टींवर विचार करावा लागला. खूप काही घडले होते. ही जबाबदारी पेलण्यासाठी माझी मानसिक स्थिती योग्य आहे की नाही, याची मला खात्री नव्हती'.
संघाला पुढे नेण्याबाबतच्या चर्चेवर अधिक विचार करताना रोहितच्या लक्षात आले की, संघाला त्याची गरज आहे. कदाचित कर्णधार म्हणून नाही, तर एक अशी व्यक्ती म्हणून जी त्यांना योग्य दिशा दाखवू शकेल. रोहित म्हणाला की, 'मला एक जाणीव झाली. मी असे म्हणत नाहीये की या संघाला माझी कर्णधार म्हणून गरज आहे, पण उलट, या संघाला दिशा मिळण्याची गरज आहे'.
Watch Ro in a heart to heart with Jatin Sapru as he talks about returning as Apla Captain, and shares a very special message for आपली Paltan! https://t.co/Lc0Bl0kjbV
Mumbai Indians (mipaltan) November 28, 2026
रोहित शर्मा खूप विचार केल्यावर मग मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनण्यासाठी तयार झाला. रोहित शर्माने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती आणि या पहिल्याच सीजनला त्याने संघाला चॅम्पियन बनवलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. रोहित म्हणाला, 'मला जाणीव झाली की हा तोच संघ आहे जो मी घडवला होता. मी 10 वर्षे या संघाचे नेतृत्व केले आहे. मला असे वाटले की, आता पुन्हा एकदा ते आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे'.