Rohit Sharma Mumbai Indians Captain : इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल 2027 साठी त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रोहित शर्मा हा आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार असून तीन वर्षांनी पुन्हा एकदा संघ रोहितच्या नेतृत्वात आयपीएलच्या मैदानात उतरेल. मात्र रोहितच्या नावाची कर्णधार म्हणून घोषणा करताना मुंबई इंडियन्सने अनेक गोष्टी विशेष करून सांभाळल्या. अगदी तारखेपासून ते घोषणेच्या वेळेपर्यंत सर्व काही मुंबई इंडियन्सने अचूक प्लॅनिंग करून केलं होतं. मुंबई इंडियन्सचे फॅन्स रोहित पुन्हा कर्णधार झाल्यामुळे उत्साहित झाले आहेत. तेव्हा मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून रोहितची घोषणा करण्यासाठी '27 नोव्हेंबर' हीच तारीख का निवडली याचं कारण जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्सने '27 नोव्हेंबर' हीच तारीख का निवडली?
रोहित शर्माची कर्णधार म्हणून घोषणा करण्यासाठी मुंबई इंडियन्सने 27 नोव्हेंबर 2026 ही तारीख निवडली. एवढंच नाही तर संध्याकाळी अचूक 5 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी याबाबत अधिकृतपणे जाहीर केले. 27 नोव्हेंबर ही तारीख निवडण्यामागे कारण काय आहे हे मुंबई इंडियन्सने अधिकृतपणे जाहीर केलेलं नसलं तरी याबाबत काही अंदाज लावले जात आहेत. चार वर्षांपूर्वी म्हणजेच 27 नोव्हेंबर 2023 रोजी हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडून ट्रेड होऊन मुंबई इंडियन्समध्ये परतला तेव्हा कर्णधार म्हणून त्याची घोषणा याच दिवशी करण्यात आलेली.याच दिवशी रोहित शर्माला कर्णधारपदावरून पायउतार करून मुंबईने हार्दिकला कर्णधार केलं होतं. त्यामुळे शुक्रवार 27 नोव्हेंबर 2026 रोजी म्हणेजच 4 वर्षांनी मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार म्हणून रोहित शर्माची घोषणा करण्यासाठी ही तारीख ठरवली.
5:45 हीच वेळ का निवडली?
मुंबई इंडियन्सने फक्त 27 नोव्हेंबर ही तारीखच नाही तर वेळ सुद्धा खास निवडल्याचं बोललं जात आहे. मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाची घोषणा ही संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी केली. ही वेळ निवडण्याचं कारण सांगण्यात येतंय की 5:45 या संख्येतील 5 हा आकडा मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकलेल्या 5 आयपीएल ट्रॉफीची संख्या दर्शवतो तर 45 हा रोहित शर्माचा जर्सी नंबर आहे.