IND vs WI निर्णायक सामना पावसामुळे रद्द, कोणी मारली मालिकेत बाजी? वाचा सविस्तर
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज मालिकेचा शेवटचा सामना पार पडला, हा निर्णायक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या मालिकेचा विजेता कोण ठरला यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाचवा निर्णायक सामना रद्द करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून बंगळुरुमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे, सामना रद्द झाल्यामुळे मालिका बरोबरीत संपली आहे. भारताच्या संघाने दोन सामने मालिकेचे जिंकले होते तर दोन सामने वेस्ट इंडिजच्या संघाने जिंकले होते. आता पाचवा आणि निर्णायक सामना रद्द झाल्यामुळे मालिका बरोबरीत संपली आहे. आता या सामन्यामध्ये भारताच्या संघाने प्लेइंग 11 मध्ये देखील काही महत्त्वाचे मोठे बदल केले होते पण सामना रद्द झाल्यामुळे नव्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली नाही.
चौथ्या सामन्यात अर्शदीप सिंगला दुखापत झाली होती पण तो या सामन्यात पुन्हा परतला होता त्याचबरोबर अनुभवी भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात 4 वर्षांनंतर खेळण्याची संधी मिळणार होती पण पावसामुळे भारताचा संघाचा दुसरा डाव पार पडला नाही. आजच्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने संघासाठी नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरुमध्ये मुसळधार पाऊस सातत्याने पडत होता नाणेफेक 2.30 तास उशीराने झाले, त्याचबरोबर सामन्याचे ओव्हर देखील कमी करण्यात आले आणि 9-9 ओव्हरचा खेळ खेळवण्याचा अंपायरने निर्णय घेतला होता.
हे ही वाचा
'कोहली अहंकारी आहे...' एबी डिव्हिलियर्स का म्हणाला असा विराट कोहलीबद्दल? उघड झाले सर्वात मोठे रहस्य
कमी ओव्हरचा खेळ होणार होता म्हणून या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या डावामध्ये फलंदाजी करायची होती त्यामुळे टीम इंडियाची दोन्ही अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. पहिल्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने पहिला विकेट गमावला. पहिल्या डावामध्ये भारताच्या संघाने 7.4 ओव्हरचा खेळ खेळला आणि यामध्ये टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये 118 धावा केल्या. यामध्ये इशान किशन त्याचबरोबर नमन धीर यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली.
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर अभिषेक शर्माने संघासाठी 4 चेंडूमध्ये 6 धावा केल्या आणि संजू सॅमसन याने संघासाठी 7 चेंडूमध्ये 16 धावा केल्या. अभिषेक शर्माचा विकेट गेल्यानंतर इशान किशनने दमदार फलंदाजी करायला सुरुवात केली आणि त्याने 10 चेंडूमध्ये 30 धावा केल्या, यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघासाठी 14 चेंडूमध्ये 22 धावा केल्या तर नमन धीर याने संघासाठी 6 चेंडूमध्ये 24 धावा केल्या यामध्ये त्याने 3 षटकार आणि 1 चौकार मारला.