• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /W, W, W, W, W, W, W... टीम इंडियाने झिम्बाब्वेला 197 धावांवर गुडाळलं! श्री चरणीच्या फिरकीसमोर फलंदाज फेल

W, W, W, W, W, W, W... टीम इंडियाने झिम्बाब्वेला 197 धावांवर गुडाळलं! श्री चरणीच्या फिरकीसमोर फलंदाज फेल

भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघाचा सामना सुरु आहे, एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात सुरुवातीपासून टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला 197 धावांवर गुडाळलं.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 23, 2026, 05:34 PM IST|Updated: Oct 23, 2026, 06:07 PM IST
joinshare
W, W, W, W, W, W, W... टीम इंडियाने झिम्बाब्वेला 197 धावांवर गुडाळलं! श्री चरणीच्या फिरकीसमोर फलंदाज फेल

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत महिला संघ विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघ यांच्यामध्ये मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याची पहिली इनिंग पार पडली, या सामन्यामध्ये भारतीय महिला संघाचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली, या सामन्यात श्री चरणी आणि क्रांती गौड यांची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. झिम्बाब्वेच्या महिला संघाने पहिल्या इनिंगमध्ये 197 धावा केल्या, पूर्ण ओव्हर न खेळता झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद झाला. या सामन्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. 

भारत महिला संघ विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघ यांच्यामध्ये झिम्बाब्वेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये झिम्बाब्वेच्या संघाने पहिले फलंदाजी करत झिम्बाब्वेला 197 धावांवर सर्वबाद केले. भारतीय महिला संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर आजच्या सामन्यामध्ये झिम्बाब्वेच्या संघाविरुद्ध श्रीचरणीने सर्वाधिक विकेट्स घेतले. श्री चरणीने संघासाठी 4 विकेट्स नावावर केले. तर क्रांती गौडने संघाला 3 विकेट्स घेऊन संघासाठी मोलाचे योगदान दिले. 

हे ही वाचा

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा

भारताने या सामन्यात जिंतिमणी कलिताला पदार्पणाची संधी दिली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या रेणुका सिंगच्या जागी तिला संधी मिळाली आहे. दिप्ती शर्माने भारतीय संघासाठी 2 विकेट्स घेतले तर शेफाली वर्माने संघाला 1 महत्त्वाचा विकेट मिळवून दिला. या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीवर लक्ष असणार आहे कारण आज भारतीय संघाची जोडी बदलेली असणार आहे, शेफाली वर्माच्या जागेवर आजच्या सामन्यामध्ये प्रतिका रावल ओपनिंग करताना दिसणार आहे. त्यामुळे स्मृती मानधना आणि प्रतिका रावल दोघींच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. 

Innings Break! Sree Charani's -fer and Kranti Gaud's -fer lead #TeamIndia's bowling charge  Over to the batters! Scorecard  https://t.co/rohw1JYI7e #INDvZIM | @mflone_ https://t.co/iD6YzzkrAh

— BCCI Women (@BCCIWomen) October 23, 2026

झिम्बाब्वेकडून बिलावेद बिझाने पाच चौकारांच्या मदतीने 62 धावा करत शानदार अर्धशतक झळकावले. त्याव्यतिरिक्त, झिम्बाब्वेचा इतर कोणताही फलंदाज फार काही करू शकला नाही. यष्टीरक्षक-फलंदाज मॉडेस्टर मुपाचिकवाने २५ धावांचे योगदान दिले, तर मिचेल मावुंगाने 29 धावा केल्या. भारताकडून, श्री चरणीने 23 धावांत चार बळी घेतले, तर क्रांती गौडने तीन बळी घेतले. दीप्ती शर्माने दोन बळी घेतल्याने, झिम्बाब्वेचा डाव 49.5 षटकांत 197 धावांवर आटोपला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sports News
Smriti Mandhana
Cricket News