याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला
Rising Asia Cup 2026 : आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये रविवारी भारताचा पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला. मात्र भारताला या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करून बदला घेण्याची संधी मिळू शकते.
Rising Asia Cup 2026 : आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये रविवारी झालेल्या ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करून सेमी फायनलचं तिकीट पक्कं केलं आहे. आता भारताचा पुढील सामना हा यूएई विरुद्ध होणार असून हा सामना भारताने जिंकल्यास ते सेमी फायनलसाठी क्वालिफाय होतील. मात्र रविवारी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेला सामना टीम इंडियाचे खेळाडू तोपर्यंत विसरणार नाहीत जो पर्यंत दोन्ही संघ पुन्हा एकदा स्पर्धेत आमने सामने येत नाहीत आणि भारत पाकिस्तानला पराभूत करत नाही. अंडर 19 आशिया कपमध्ये सुद्धा असच झालं होतं. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. मग फायनल सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने खिताब जिंकला. याच महिन्यात आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करण्याची संधी भारताला मिळू शकते.
आशिया कप रॅकिंग स्टार्समध्ये रविवारी भारत - पाकिस्तान संघ आमने सामने आल्याने सुरुवातीपासूनच माहोल गरम होता. त्यात पाकिस्तानने फलंदाजी निवडली. भारताचा गोलंदाज हर्षित राणाचा पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत वाद झाला. शमील हुसैन, इमरान रंधावा आणि मज्ज सदाकत सोबत हर्षित राणा भिडला. जेव्हा हर्षित राणा बाद झाला तेव्हा पाहायला मिळालं की पाकिस्तानचा संघ विजयाच्या दिशेने जात होता आणि ते खूप अग्रेसिव्ह झाले होते. वैभव सूर्यवंशी 11 धावांवर बाद होऊन परतत असताना पाकिस्तानी खेळाडू त्याला टोमणे मारत होते, अशा वेळी तिलक वर्माने मध्ये पडून हस्तक्षेप केला.
हेही वाचा : ऋषभ पंतचं शतक टीम इंडियासाठी Unlucky? काय आहे हा नकोसा रेकॉर्ड
कधी होणार भारताचा पुढील सामना?
आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये भारताचा पुढील सामना हा यूएई सोबत मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुपारी 3:30 वाजता हा सामना होणार असून हा सामना जिंकल्यास टीम इंडिया सेमी फायनल पोहोचू शकतो. पहिला सेमी फायनल सामना हा 26 नोव्हेंबर आणि दुसरा सेमी फायनल सामना हा 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर फायनल सामना हा रविवारी 29 नोव्हेंबर रोजी होईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी होऊ शकतो?
आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान समोरा समोर येऊ शकतात आणि हे फक्त फायनलमध्ये शक्य आहे. फॉरमॅटनुसार गट 'अ' मधील अव्वल क्रमांकाचा संघ उपांत्य फेरीत गट 'ब' मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध खेळेल. जर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जर सेमी फायनलचा सामना जिंकले तर ते फायनल सामन्यात पुन्हा एकदा आमने सामने येतील.