भारताचा मालिकेतील दुसरा विजय, टीम इंडियाने न्यूझीलंडला 4 धावांनी केलं पराभूत!
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 4 धावांनी विजय मिळवून मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना आज खेळवण्यात आला, या सामन्याचे आयोजन न्यूझीलंडमधील वेलिंग्टन प्रादेशिक स्टेडियमवर करण्यात आले होते. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 4 धावांनी विजय मिळवला, या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचे फलंदाज पूर्णपणे फेल झाले. भारतीय फलंदाजांनी देखील या सामन्यामध्ये निराश केले पण त्यानंतर रोहित शर्मा, श्रेयस अय्यर या खेळाडूंनी संघाची कमान सांभाळली आणि भागीदारी करुन संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिकेचा दुसरा टी20 सामना हा आज पाक पडला, या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर या सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत 41 ओव्हरमध्ये टीम इंडियाने किवी संघाला गुंडाळले. या सामन्यामध्ये आणखी न्यूझीलंडची खराब कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या संघाला डीएलएस मेथडनुसार हा विजय मिळाला. अंशुल कंबोज बाद झाल्यानंतर भारताच्या संघाने 7 विकेट्स गमावले होते, टीम इंडियाला 4 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
हे ही वाचा
मोहम्मद शमीने अचानक ठोकला कसोटी क्रिकेटला रामराम! सोशल मिडियावर केली निवृत्ती जाहीर
भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाचा युवा गोलंदाज गुरनुर ब्रारची आजच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. त्याने आजच्या सामन्यामध्ये 10 ओव्हरमध्ये 30 धावा दिल्या आणि 4 विकेट्स नावावर केले. त्याच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात यश मिळाले. तर अकुब नबी, अक्षर पटेल आणि अंशुल कंबोज यांची देखील कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. या तीनही फलंदाजांनी प्रत्येकी आज दोन विकेट्स घेतले.
न्यूझीलंडच्या १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या ४ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. भारतीय कर्णधार शुभमन गिल शून्यावर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विराट कोहलीही केवळ ७ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रोहित शर्मा २८ चेंडूंमध्ये २३ धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर श्रेयस अय्यरने ४६ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या, तर अक्षर पटेल ७ धावांवर धावबाद झाला.