टीम इंडियाचा 8 विकेट्सने विजय, आशिया कपमध्ये भारताची फायनलमध्ये एन्ट्री!
आशिया कप फायनलच्या सामन्यामध्ये भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे, याआधी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
अंडर 19 आशिया कप 2026 चा सेमीफायनलचे सामने आज पार पडले. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाकिस्तान अंडर 19 विरुद्ध बांग्लादेश अंडर 19 यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने विजय मिळवला. तर दुसरा सेमीफायनलचा सामना हा भारत अंडर 19 विरुद्ध अफगाणिस्तान अंडर 19 यांच्यामध्ये पार पडला, या सामन्यात भारताच्या संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. आता या आशिया कप फायनलच्या सामन्यामध्ये भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे, याआधी सेमीफायनलच्या सामन्यामध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अफगाणिस्तानच्या संघाला चांगलाच महागात पडला, अफगाणिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 227 धावा केल्या होत्या. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने हे लक्ष्य 36.5 ओव्हरमध्ये पूर्ण केले आणि 8 विकेट्सने विजय मिळवून फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.
हे ही वाचा
6,6,6,6,4,4,4,4... आर्यवीर सेहवागचा सेमीफायनलमध्ये धूमाकुळ! उपांत्य फेरीत ठोकले अर्धशतक
भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाचा इशान सूद याने आणखी एकदा त्याच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. इशान सूद याने संघासाठी या सामन्यात तीन विकेट्स घेतले आणि आर्यन सवसानी याने संघासाठी दोन विकेट्स मिळवून दिले. या स्पर्धेमध्ये इशान सूदची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली आहे. यशवर्धन चौहान, अर्जुन राजपूत आणि काव्या पटेल यांनी संघासाठी प्रत्येकी एक विकेट घेतला.
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाज टीम इंडियाचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवागने संघासाठी कमालीची कामगिरी केली. दोघांनीही संघासाठी शतकीय भागिदारी केली, तर भारताचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी याचे 7 धावांनी शतक हुकले. आर्यवीर सेहवागने संघासाठी आजच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 51 धावांची खेळी खेळली तर लक्ष्य रायचंदानी याने संघासाठी 93 धावा केल्या. आर्यवीरने संघासाठी कमालीची कामगिरी करत त्याने चौकार आणि षटकार ठोकले. व्हिके विनिथ याने संघासाठी नाबाद 57 धावा केल्या, तर यशवर्धनने संघासाठी नाबाद 16 धावा केल्या.