SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, कोणाला मिळाले संघात स्थान? डिसेंबरमध्ये होणार 7 सामने!

भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिल्यांदाच स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारताचा संघ कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. आता बीसीसीआयने घोषणा केलेल्या या मालिकेंच्या तीनही संघ कसे आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 10, 2026, 15:44 IST | Updated: Nov 10, 2026, 16:01 IST
Join

स्मृती मानधनाकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर भारताच्या महिला संघाने नुकत्याच झालेल्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेमध्ये एकतर्फी विजय मिळवला. या मालिकेनंतर आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे, यासाठी आता बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन मालिका खेळणार आहे यामध्ये टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळणार आहे. भारताचा संघ या दौऱ्यावर पहिल्यांदाच स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारताचा संघ कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. आता बीसीसीआयने घोषणा केलेल्या या मालिकेंच्या तीनही संघ कसे आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.

भारताचा महिला संघ हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी सामन्यापासून सुरुवात करणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकमेव कसोटी सामना खेळणार आहेत. हा कसोटी सामना 9 ते 12 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे, त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर टी20 मालिकेचे देखील तीन सामने भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तीनही फॅारमॅटमध्ये भारताच्या संघाचे नेतृत्व स्मृती मंधाना करताना दिसणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाची उपकर्णधार दिप्ती शर्मा असणार आहे, तर टी20 संघाचे उपकर्णधारपद हे शेफाली वर्माकडे सोपवण्यात आले आहे.

हे ही वाचा

IND vs NZ शेवटच्या दोन सामन्यामधून कॅप्टन गिल का झाला बाहेर? जाणून घ्या कारण

कसोटी संघ: स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकिपर), यास्तिका भाटिया (विकेटकिपर), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), श्री चरणी, स्नेह राणा, क्रांति गौड़, नंदिनी शर्मा, जिंतिमणि कलिता आणि सायली सतघरे

एकदिवसीय संघ : स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, ऋचा घोष (विकेटकिपर), यास्तिका भाटिया (विकेटकिपर), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांति गौड़, नंदिनी शर्मा, जिंतिमणि कलिता आणि सयाली सतघरे.

T20 संघात स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, निक्की प्रसाद, रिचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), अनुष्का शर्मा, दीप्ती शर्मा, श्री चरणी, प्रेमा रावत, अमनजोत कौर, क्रांति गौड़, नंदिनी शर्मा, रेणुका सिंह ठाकुर, अरुंधति रेड्डी आणि सयाली सतघरे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES