भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 10 नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे आयोजित केलेल्या सामन्यामध्ये नाणेफेक झाले पण सातत्याने पाऊस कोसळत होता त्यामुळे ओल्या मैदानामुळे तिसऱ्या सामन्यामध्ये एकही चेंडू टाकता आला नाही. मालिकेचा तिसरा सामना रद्द झाल्यानंतर आता चौथ्या सामन्यामधून टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिला चौथ्या सामन्यामध्ये खेळताना दिसणार आहे. चौथ्या सामन्यामध्ये भारतीय संघातून कोणते खेळाडू बाहेर होणार आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेच्या चौथ्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा सुधारित संघ खेळताना दिसणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार या दोन सामन्यासाठी श्रेयस अय्यर असणार आहे. श्रेयस अय्यर चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. मालिकेचा चौथा आणि पाचवा सामना हा माऊंट माउंगानुई येथे खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने आधीच सोशल मिडियावर पहिल्या तीन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली होती त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये काही खेळाडू हे खेळताना दिसणार नाहीत.
हे ही वाचा
भारताचा शुभमन गिल व्यतिरिक्त, केएल राहुल आणि अंशुल कंबोज हे देखील अंतिम एकदिवसीय सामना खेळणार नाहीत. गिल, राहुल आणि कंबोज यांचा संघात केवळ पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठीच समावेश करण्यात आला होता. आता, हे तिन्ही खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारतीय कसोटी संघात सामील होतील. हे तीन खेळाडू संघाबाहेर झाल्यानंतर आता त्यांच्या जागेवर तिलक वर्मा, कुमार कुशाग्र आणि यश ठाकूर हे खेळाडू खेळताना दिसतील. प्रसिद्ध कृष्णा हा भारतीय संघामध्ये सामील झाला होता पण तो दुखापतीमुळे संघातून आधीच बाहेर झाला होता.
News #TeamIndia’s ODI and Test squads for New Zealand tour announced Captain Shubman Gill will lead the side for the first ODIs, before Shreyas Iyer takes charge for the last matches. More details https://t.co/npwxUYlb1N #NZvIND https://t.co/3ckm7ixgEN
— BCCI (@BCCI) October 16, 2026
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकिपर आणि उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, रुतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकुर आणि कुलदीप यादव.