टीम इंडियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंड संघाला हरवलं, भारताचा 22 धावांनी विजय!
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाचव्या सामन्यामध्ये विजय मिळवून दिला आणि टीम इंडियाने मालिका देखील नावावर केली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात वाचा.
India vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा पाचवा सामना पार पडला. हा सामना बाय ओव्हल या मैदानावर पार पडला, या सामन्यामध्ये टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे ढासळली होती. भारतीय संघाच्या प्रभावी गोलंदाजीने टीम इंडियाने या सामन्यामध्ये 22 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, आकिब नबी या गोलंदाजी प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाचव्या सामन्यामध्ये विजय मिळवून दिला आणि टीम इंडियाने मालिका देखील नावावर केली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात वाचा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा संघ 42.1 ओव्हरमध्ये सर्वबाद झाला, चौथ्या सामन्यामध्ये ज्याप्रकारे टीम इंडियाचे सुरुवातीचे फलंदाज फेल झाले त्याप्रकारे आजही रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघासाठी 22 धावा केल्या आणि विकेट गमावली. त्यानंतर फलंदाजीला अक्षर पटेल आणि इशान किशन आले आणि त्यांची भागिदारी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरली.
हे ही वाचा
'स्टार बॉय...' आर्यवीर सेहवाग सर्वोत्तम खेळाडू ठरल्यानंतर वैभव सूर्यवंशीने केली खास पोस्ट!
टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडियाचा इशान किशन आणि अक्षर पटेल यांची भागिदारी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरली. आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये इशान किशनने 58 चेंडूमध्ये 46 धावा केल्या यामध्ये त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. अक्षर पटेलने देखील आजच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली अक्षरने आजच्या सामन्यामध्ये 55 चेंडूमध्ये 46 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारले.
भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर 3 विकेट्स अर्शदीप सिंगच्या नावावर होते. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी संघाला 2 विकेट्स मिळवून दिले. आकिब नबी, यश ठाकूर आणि नमन धीर यांनी संघासाठी प्रत्येकी 1 विकेट घेतला. या विजयासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये 3-1 असा विजय देखील मिळवला आहे. आता टी20 आणि एकदिवसीय मालिकेमध्ये विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेवर भारतीय संघाची नजर असणार आहे.