SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मंगळवारी येणार IPL 2027 च्या रिटेन्शन लिस्ट, 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम असणारे 5 खेळाडू होऊ शकतात रिलिज

IPL 2027 : उद्या 17 नोव्हेंबरपर्यंत आयपीएल संघांना रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. मात्र या सगळ्यात 5 खेळाडूंच्या नाही चर्चा आहे ज्यांची किंमत ही 10 कोटी असून त्यांना आयपीएल संघ रिलीज करू शकतात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 16, 2026, 14:44 IST | Updated: Nov 16, 2026, 15:50 IST
Image Credit: मंगळवारी येणार IPL 2027 च्या रिटेन्शन लिस्ट
Join

IPL 2027 : IPL 2027 साठी सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यासाठी बीसीसीआयने 17 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत सारखे खेळाडू आधीच ट्रेड झालेत, त्यामुळे ते ऑक्शनमध्ये दिसणार नाहीत. मात्र जर आगामी सीजनसाठी रिटेन्शनपेक्षा कोणते खेळाडू रिलीज होणार याची चर्चा सध्या क्रिकेटविश्वात जोरदार रंगली आहे.

डिसेंबर महिन्याच्या 16 तारखेला मिनी ऑक्शन होणार असून यापूर्वी फ्रेंचायझी त्यांच्या संघातून महागड्या खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे 25 कोटी किंमतीचा कॅमरुन ग्रीन आहे. तर लखनऊ सुपर जाएंट्सकडे 21 कोटींच्या रकमेचा निकोलस पुरन आहे. ज्याचा मागचा सीजन हा चांगला गेला नव्हता. आयपीएलमधील अशा 5 खेळाडूं विषयी जाणून घेऊयात ज्यांची किंमत ही 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असून त्यांना यंदा संघ रिलीज करू शकतात.

कॅमरुन ग्रीन :

2026 च्या ऑस्कशनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने कॅमेरून ग्रीनला 25.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. KKR ने त्याला 'गेम-चेंजर' म्हणून संघात सामील केले होते, मात्र या भूमिकेला न्याय अपयशी ठरला  परंतु तो या भूमिकेला न्याय देण्यात अपयशी ठरला असे म्हणता येईल. मागच्या सिजनमध्ये 14 सामन्यांत 322 धावा केल्या आणि 7 विकेट घेतले.

ट्रेंट बोल्ट :

ट्रेंट बोल्ट हा आयपीएलमध्ये त्याचे 150 विकेट्स पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र मागच्या सीजनमध्ये त्याने केवळ 2 विकेट घेतल्यामुळे त्याला संघ रिलीज करू शकतो. गोलंदाजीच्या बाबतीत गेल्या हंगामात बोल्टचा इकॉनॉमी रेट 11.62 इतका होता.

प्रशांत वीर :

रवींद्र जडेजाच्या ट्रेडनंतर आता चेन्नई सुपरकिंग्सला त्याच्या रिप्लेसमेंटची गरज होती. आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने स्पिन गोलंदाज ऑलराउंडर प्रशांत वीर याला 14.20 कोटींना विकत घेतलं. त्याला गोलंदाजी करण्याची फारशी संधी मिळाली नाही आणि फलंदाजी करताना तो 5 डावांमध्ये मिळून फक्त 90 धावा करू शकला.

हेही वाचा : तिरंग्याचा अपमान होताना पाहून मोहम्मद सिराजने घेतली सुरक्षारक्षकाकडे धाव, पुढे जे केलं ते पाहून सर्वांनी केलं कौतुक, Video

मार्कस स्टोइनिस :

हार्दिक पंड्या पंजाब किंग्समध्ये आल्यावर आता  मार्कस स्टोइनिसची जागा धोक्यात आली आहे. पंजाबकडे मार्को यान्सेन देखील असून तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे केवळ त्याच्यावर अवलंबून राहून मोठा धोका पत्करणे त्यांना कदाचित योग्य वाटणार नाही. अशा परिस्थितीत स्टॉइनिसला संघातून वगळले जाऊ शकते, कारण एकाच संघात तीन वेगवान गोलंदाजी करणारे ऑलराउंडर खेळाडू असणे जवळजवळ अशक्य आहे.

जीतेश शर्मा :

जीतेश शर्माचा परफॉर्मन्स मागच्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगला नाहीये. RCB त्याला 11 कोटी रुपये देत आहे. मात्र मागच्या दोन सीजनमध्ये जितेश 31 सामने खेळून फक्त 377 धावा करू शकला. त्यामुळे यंदा आरसीबी त्याला रिलीज करू शकते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES