• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /इरफान पठाणने केली गौतम गंभीरची पाठराखण, ट्रोलर्सला दिलं चोख उत्तर

इरफान पठाणने केली गौतम गंभीरची पाठराखण, ट्रोलर्सला दिलं चोख उत्तर

Irfan Pathan On Gautam Gambhir : भारताचा हेड कोच असलेल्या गौतम गंभीरला अनेकदा टीकाकारांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. अनेकदा सोशल मीडियावर कोणत्याही कारणाने गंभीरला ट्रोल केलं जातं. याविषयी माजी क्रिकेटर इरफान पठाणने गौतम गंभीरची पाठराखण केली आहे.

Reported Bypooja pawar
Published: Oct 24, 2026, 02:39 PM IST|Updated: Oct 24, 2026, 03:09 PM IST
joinshare
इरफान पठाणने केली गौतम गंभीरची पाठराखण, ट्रोलर्सला दिलं चोख उत्तर
Image Credit: इरफान पठाणने केली गौतम गंभीरची पाठराखण, ट्रॉलर्सला दिलं चोख उत्तर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Irfan Pathan On Gautam Gambhir : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी20 सीरीज खेळवली जात आहे. यातील दुसऱ्या सामन्यातून विकेटकिपर फलंदाज ईशान किशन हा बाहेर पडला. गुरुवारी खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ईशानला दुखापत झाली. त्यामुळेचवह पहिल्या सामन्यात सुद्धा ईशानच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्यात आला. तो पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी उतरला होता. मात्र कारण जाणून न घेता यावरून लोकांनी हेड कोच गौतम गंभीरवर टीका केली. यावेळी गौतम गंभीरचा जुना सहकारी आणि माजी क्रिकेटर इरफान पठाणने त्याची  पाठराखण केली.

काय म्हणाला इरफान पठाण?

माजी क्रिकेटर इरफान पठाणने  एक्सवर एक पोस्ट लिहिली. इरफानने यात स्पष्ट केले की, पहिल्या टी20 सामन्यात दुखापतीमुळे ईशानच्या फलंदाजीच्या क्रमांकात बदल करण्यात आला होता, तरीही लोकांनी त्यासाठी गौतम गंभीरला लक्ष्य केले. इरफान पुढे असेही म्हणाला की, 'कोणावरही टीका करण्यापूर्वी माणसाने विचार करायला हवा'.

इरफान पठाणने लिहिले, 'न्यूझीलंड पहिल्या टी20 सामन्यादरम्यान ईशान किशनला काहीसा त्रास होत होता, म्हणूनच तो फलंदाजीसाठी थोडा उशिरा म्हणजेच खालच्या क्रमांकावर आला. तरीही फलंदाजीचा क्रम बदलल्याबद्दल सर्वांनी गौतम गंभीरला लक्ष्य केले. आजकाल त्याच्यावर टीका करणे हा अनेकांचा आवडता छंदच बनला आहे'.

इरफान पठाणने पुढे लिहिले की, 'कोणतेही मत बनवण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. पूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढू नका. हे आयुष्यातील सर्व गोष्टींना लागू होते. सोशल मीडियावर 'व्ह्यूज' किंवा 'आकडे' वाढवण्याच्या घाईत, पूर्ण परिस्थिती माहीत नसतानाही तुम्ही नकळत कोणाला तरी दुखवू शकता. त्यामुळे कोणाबद्दलही मत बनवण्यापूर्वी नीट विचार करा'.

So, Ishan Kishan had a niggle during the first T20, which is why he batted lower down the order. But everyone was quick to go after GautamGambhir for changing the batting order. Criticising him has become everyone’s favourite timepass these days. Please, please wait a bit before passing judgment. Don’t jump to conclusions without knowing the full story. And this applies to everything in life. In the rush to get “views” and “numbers” on social media, you might end up hurting someone without even knowing the full story. Think before you judge.

Irfan Pathan (IrfanPathan) October 23, 2026

न्यूझीलंड सीरिजसाठी भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिंस यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, कुमार कुशाग्र (विकेटकीपर). 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Marathi News
Gautam Gambhir