मागील काही काळापासून टीम इंडियाचे अनेक महत्त्वाचे खेळाडू हे दुखापतीशी झुंजत आहे, हार्दिक पांड्या मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर आहे. तर जसप्रीत बुमराह काही सामन्यांमध्ये खेळला तर काही सामन्यांमध्ये तो दुखापतीमुळे बाहेर राहिला. रिषभ पंत देखील मागील काही महिन्यांपासून भारतीय संघापासून बाहेर आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये झालेल्या मालिकांमध्ये भारताच्या संघामध्ये अनेक नव्या बदली खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. आता वृतांनी महत्त्वाची माहिती दिली आहे यामध्ये टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत लवकर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत.
भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यामध्ये सध्या सामना सुरु आहे, त्यानंतर पुढचा सामना 7 ते 10 नोव्हेंबर या दरम्यान भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. या अनधिकृत कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बीसीसीआयने कोणतीही माहिती शेअर केलेली नाही, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांना बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून तंदुरुस्तीची परवानगी मिळाल्यास दोन्ही खेळाडू भारत 'अ' संघात सामील होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा
भारताचा पुरुष संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, भारत या दौऱ्यावर टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका वेलिंग्टन येथे 19-23 नोव्हेंबर आणि क्राइस्टचर्च 27 नोव्हेंबर-1 डिसेंबर येथे खेळवली जाईल. भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे त्याचे कारण म्हणजेच जागतिक कसोटी चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियाला पहिल्या दोन स्थानी गुणतालिकेमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. कोणत्याही मालिकेपूर्वी सर्व खेळाडूंसाठी 'खेळात पुनरागमन' करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने बुमराहचा CoE दौरा आहे, ज्यानंतर तो 1 नोव्हेंबरला न्यूझीलंडला रवाना होईल.
ऋषभ पंत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात इराणी कपमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध 'रेस्ट ऑफ इंडिया' संघाचे नेतृत्व करत विजय मिळवताना झालेल्या दुखापतीतून पंत सावरत आहे. या दुखापतीमुळे तो रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत दिल्लीकडून, तसेच न्यूझीलंड 'अ' संघाविरुद्धच्या पहिल्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पंतने सीओई (COE) येथे फलंदाजीच्या सरावासह हलका सराव सुरू केला आहे. मात्र, त्याने अद्याप यष्टीरक्षण पुन्हा सुरू केलेले नाही.