• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /अंपायरच्या एका चुकीने तुटलं देवदत्त पडिक्कलचं स्वप्न; 1 धावेने मुकलं द्विशतक! पहा व्हिडिओ

अंपायरच्या एका चुकीने तुटलं देवदत्त पडिक्कलचं स्वप्न; 1 धावेने मुकलं द्विशतक! पहा व्हिडिओ

भारताचा अ संघ देखील या दौऱ्यावर न्यूझीलंड अ संघाविरुद्ध मालिका खेळत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिनी अंपायरच्या एका चुकीमुळे देवदत्त पडिक्कल याचं 1 धावेने द्विशतक हुकले आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 26, 2026, 06:31 PM IST|Updated: Oct 26, 2026, 06:41 PM IST
joinshare
अंपायरच्या एका चुकीने तुटलं देवदत्त पडिक्कलचं स्वप्न; 1 धावेने मुकलं द्विशतक! पहा व्हिडिओ

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारताचा पुरुष संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, तर भारताचा अ संघ देखील या दौऱ्यावर न्यूझीलंड अ संघाविरुद्ध मालिका खेळत आहे. टीम इंडियाने मागील काही दिवसांपासून ही मालिका सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी भारताची कामगिरी फार काही चांगली राहिली नाही पण दुसऱ्या दिवशी देवदत्त पडिक्कलने संघासाठी कमालीची कामगिरी केली पण त्याचे द्विशतक एक धावेने हुकले. 199 धावांवर देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर त्याचा विकेट हा वादग्रस्त ठरला आहे. भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेमध्ये नक्की काय वाद झाला यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.

भारताचा स्टार कसोटी क्रिकेटमधील खेळाडू देवदत्त पडिक्कल मागील दोन दिवसांपासून कमालीची कामगिरी करत आहे. 199 धावांवर देवदत्त पडिक्कल हा फलंदाजी करत होता आणि यावेळी मध्यमगती गोलंदाज झॅक गिब्सनच्या गोलंदाजीवर लेग साईडला यष्टीमागे झेलबाद झाल्यामुळे पडिक्कलचे द्विशतक हुकले. जेव्हा पंचांनी बोट वर केले, तेव्हा पडिक्कलला धक्का बसला आणि चेंडू त्याच्या बॅटला लागला नसल्याचे दर्शवण्यासाठी त्याने हातवारे केले. तो तिथेच निःशब्द उभा राहिला आणि नंतर डगआऊटमध्ये परत गेला. त्यानंतर ज्याप्रकारे खेळाडू चकित झाला त्याचप्रमाणे क्रिकेट चाहते देखील थक्क होते.

हे ही वाचा

W,W,W,W,W,W,W... सारांश जैनच्या फिरकीची जादू! बिहारच्या संघाला 99 धावांवर गुंडाळलं

या सामन्यामध्ये डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम (DRS) किंवा स्निकोमीटरचा वापर केला जात नव्हता, त्यामुळे पडिक्कलकडे मैदानाबाहेर जाण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. पडिक्कलने आपल्या 248 चेंडूंच्या खेळीत 23 चौकार आणि तीन षटकार मारले. भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठी पडिक्कलचा दावा प्रबळ आहे. श्रीलंकेत सलग दोन कसोटी शतके झळकावून पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावरील आपले स्थान जवळपास पक्के केले होते, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेपूर्वी संघ व्यवस्थापनाला तंदुरुस्त असलेल्या साई सुदर्शनलाही संधी द्यायची होती, ज्याने प्रभावी 91 धावा केल्या. त्याने पडिक्कलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली.

DEVDUTT PADIKKAL ANGRY OVER A CONTROVERSIAL UMPIRING DECISION!  - Padikkal was batting on 199 when the bowler delivered the ball wide. - Padikkal tried to play the delivery, but the umpire suddenly declared him out, apparently believing the ball had edged the bat. - Padikkal was left shocked by the decision. Note: There is no DRS in unofficial Test matches.  https://t.co/WfZMaQfAXM

— Sam (@cricsam02) October 26, 2026

या सामन्यामध्ये सामन्याच्या तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाने 284 धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर टीम इंडियाने 488 धावा करत 8 विकेट्स गमावून 119 ओव्हरचा खेळ झाला आहे. या सामन्यामध्ये देवदत्त पडिक्कल व्यतिरिक्त साई सुदर्शनने 91 धावांची खेळी खेळली. तर यश राठोड याने संघासाठी 66 धावा केल्या आणि वॅाशिंग्टन सुंदरने संघासाठी 51 धावांची खेळी खेळली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News
Sports News