• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /जसप्रीत बुमराह 5 सामन्यातून बाहेर? टीम इंडिया मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

जसप्रीत बुमराह 5 सामन्यातून बाहेर? टीम इंडिया मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

Jasprit Bumrah IND VS NZ : जसप्रीत बुमराहबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. न्यूझीलंड दौऱ्यात बुमराहच वर्क लोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन त्याला केवळ टेस्ट सीरिजमध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

Reported Bypooja pawar
Published: Oct 15, 2026, 03:18 PM IST|Updated: Oct 15, 2026, 03:46 PM IST
joinshare
जसप्रीत बुमराह 5 सामन्यातून बाहेर? टीम इंडिया मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
Image Credit: जसप्रीत बुमराह 5 सामन्यातून बाहेर? टीम इंडिया मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Jasprit Bumrah IND VS NZ : न्यूझीलंड विरुद्ध टी20 सीरिजसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. तर वनडे आणि टेस्ट सीरिजची घोषणा होणं बाकी आहे. असा दावा करण्यात येतोय की 2 ते 3 दिवसात टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि ऋषभ पंत यांसारख्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबतची माहिती मिळाल्यानंतर संघाची घोषणा केली जाईल. मात्र जसप्रीत बुमराहबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. असं म्हंटलं जातंय की, न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी त्याला संघात स्थान दिले जाणार नाही. टीम मॅनेजमेंटची अशी इच्छा आहे की जसप्रीत बुमराहने आता टेस्ट क्रिकेटच्या सामन्यांकडे लक्ष द्यावं.

बुमराहसाठी बनवला वेगळा प्लॅन :

मीडिया रिपोर्ट्सनुसार बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मात्र 19 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनमध्ये टेस्ट सीरिज सुरू होण्यापूर्वी त्याने 'इंडिया ए' संघासाठी तिसऱ्या सराव सामन्यात खेळावे अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. बुमराहने टेस्ट क्रिकेटसाठी आपली तयारी सुरू केली असून, तो लवकरच बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल होईल.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, 'या न्यूझीलंड विरुद्ध मोठ्या दौऱ्यासाठी बुमराह सारख्या खेळाडूच्या बाबतीत प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. न्यूझीलंड विरुद्ध  टेस्ट सीरिज अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच टीम मॅनेजमेंटने त्याला वनडे सीरिजमध्ये खेळवू इच्छित नाही. त्यांना हवं आहे की तो टेस्ट सीरिजसाठी पूर्णपणे फिट असावा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बुमराहने शेवटचा टेस्ट सामना गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला होता. भारतीय संघाला 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे. म्हणूनच संघ कोणत्याही परिस्थितीत बुमराहला टेस्ट सीरिजमध्ये समाविष्ट करण्यास उत्सुक आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठीच नाही तर...

सूत्रांच्या माहितीनुसार बुमराहसाठीची ही योजना केवळ न्यूझीलंड दौऱ्यापुरतीच मर्यादित नाही. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील महत्त्वाच्या सामन्यांमध्येही त्याला खेळवले जाणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असावा, अशी टीम इंडियाची  इच्छा आहे. भारतीय संघाची ही रणनीती किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Jasprit Bumrah
Marathi News
News in Marathi
Cricket News
Team india