मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! तीन विश्वासातल्या माणसांनी साथ सोडली, मलिंगा सहित....
Mumbai Indians IPL 2027 : आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल झालेले आहेत. कोचिंग स्टाफमधील लसिथ मलिंगासह आणखीन दोघांनी आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सची साथ सोडली आहे.
Mumbai Indians IPL 2027 : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी20 लीगपैकी एक आहे. या स्पर्धेचा पुढील वर्षी 20 वा सीजन पार पडणार असून या सीजनसाठी सध्या सर्व 10 फ्रेंचायझी आपल्या कोचिंग स्टाफची फळी तयार करण्यात व्यस्त आहेत. अनेक संघांच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल झाले असून यात मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत. कोचिंग स्टाफमधील लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन या तिघांनी आगामी आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सची साथ सोडली आहे. हे तिघे मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग होते. यापूर्वी देखील मुंबई इंडियन्सचा माजी हेड कोच महेला जयवर्धनेने संघाची साथ सोडली होती. त्याच्या ऐवजी आयपीएल 2027 साठी आयपीएल बॅटिंग कोच कायरन पोलार्ड याला हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले.
मुंबई इंडियन्सने स्वतः केली पोस्ट :
गुरुवारी 29 ऑक्टोबर रोजी दुपारी मुंबई इंडियन्सने स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सदर बातमी देत पोस्ट केली. यात मुंबई इंडियन्सने आज जाहीर केले की, लसिथ मलिंगा, पारस म्हांम्ब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन हे पुरुष संघाच्या कोचिंग सेटअपमधील आपापल्या पदावरून पायउतार होत आहेत. फ्रँचायझीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांच्या निष्ठेबद्दल आणि त्यांनी बजावलेल्या सेवांबद्दल त्यांचे आभार मानले आहोत'.
अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स सोबत करत होते काम :
आयपीएल 2027 पूर्व संघापासून बाजूला जाणारे लसिथ मलिंगा, पारस म्हांम्ब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन हे तिघेही मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचा एक अविभाज्य भाग होते. लसिथ मलिंगा हा मुंबई इंडिअन्सच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करण्यापासून ते 4 वेळा संघाला आयपीएल चॅम्पियन बनवण्यात मलिंगाचं मोठं योगदान होतं. मलिंगा हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू, कोच आणि मार्गदर्शक म्हणून सुद्धा राहिला.
हेही वाचा : मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं, पाहा 2027 साठी MI चा संपूर्ण संघ
पारस म्हांम्ब्रे याचा सुद्धा मुंबई इंडियन्ससोबत दीर्घ आणि मोलाची साथ राहिली. प्रथम 2010 ते 2017 या काळात या संघाशी जोडलेले होते आणि त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा परतले. संघातील गोलंदाजीच्या प्रतिभेला विकसित आणि जोपासण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान, तसेच गेल्या अनेक वर्षांत त्यांनी निर्माण केलेले संबंध, या सर्वांचे खूप कौतूक आहे. कार्ल हॉपकिन्सन 2025 च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. त्यांनी इंग्लंडच्या पुरुष संघासोबत काम केल्याचा मौल्यवान आंतरराष्ट्रीय अनुभव आणला होता.