मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं, पाहा 2027 साठी MI चा संपूर्ण संघ
Mumbai Indians WPL 2027 Full Squad : WPL 2027 मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं. यासाठी मुंबई फ्रेंचायझीने एकूण 70 लाख रुपये खर्च केले. तेव्हा आगामी सीजनसाठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ कसा असणार याविषयी जाणून घेऊयात.
Mumbai Indians WPL 2027 Full Squad : इंडियन प्रीमियर लीगच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या महिला प्रीमियर लीगच्या आगामी सीजनसाठी मिनी ऑक्शन पार पडलं. या मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्यांच्याजवळ इतर संघांच्या तुलनेत सर्वात कमी पर्स असताना सुद्धा 6 खेळाडूंना आपल्या संघात सामील केले. मुंबईने महिला प्रीमियर लीगच्या 2027 ऑक्शनमध्ये 70 लाख रुपये खर्च केले. दोनवेळची WPL 2027 स्पर्धेचा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ ऑक्शनमध्ये एकूण 90 लाख रुपये घेऊन उतरला होता. आक्रमक फलंदाज किरण नवगिरेसाठी मुंबई इंडियन्सने जोरदार बोली लागली होती, परंतु अखेरीस 75 लाख रुपयांची बोली लावून दिल्ली कॅपिटल्सने तिला आपल्या संघात सामील करून घेतले.
मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग 2027 च्या ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना खरेदी केलं. फ्रँचायझींनी या खेळाडूंवर प्रत्येकी 10 लाख रुपये खर्च केले. मुंबईने उत्तर प्रदेश वॉरियर्सच्या (UP Warriorz) माजी टॉप-ऑर्डर फलंदाज श्वेता सेहरावतला 20 लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. श्वेता सेहरावतला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनेही तिच्यासाठी बोली लावली होती, मात्र अखेर मुंबईने बाजी मारली.
मुंबई इंडियन्सने दिशा कासतला 10 लाख रुपयांवर खरेदी केलं. कासत व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्सने सानिका चाळके, भारती रावळ आणि लतिका इनामदार यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात सामील केले. यापैकी कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नाही.
हेही वाचा : WPL 2027 : ऑस्ट्रेलियाची कर्णधार मालामाल! कोणता खेळाडू कोणत्या संघात दाखल? वाचा सविस्तर
महिला प्रीमियर लीग 2027 मध्ये मुंबई इंडियन्स त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये अधिकाधिक पाच परदेशी खेळाडूंना सामील करू शकते. याचे कारण असे की त्यांच्या संघात 'असोसिएट' सदस्य राष्ट्रातील एका खेळाडूचाही समावेश आहे. WPL च्या नियमांनुसार जर एखाद्या संघात असोसिएट सदस्य राष्ट्रातील खेळाडू असेल, तर त्यांना पाच परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी मिळते. मुंबई इंडियन्सने ऑक्शनपूर्वी सायका इशाक, पूनम खेमनार, त्रिवेणी वशिष्ठ, नल्ला रेड्डी, मिली इलिंगवर्थ आणि जी. कमलिनी यांना सीरिज केलं होतं.
मुंबई इंडियन्सने ऑक्शनपूर्वी रिटेन केलेले खेळाडू :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, सजीवन सजना, संस्कृति गुप्ता, वैष्णवी शर्मा, राहिला फिरदौस, नट सिवर ब्रंट, अमेलिया केर, हेली मैथ्यूज, निकोला कॅरी, शबनीम इस्माइल, तारा नॉरिस,
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2027 ऑक्शनमध्ये घेतले 6 खेळाडू :
श्वेता सेहरावत- 20 लाख रुपये
दिशा कासट- 10 लाख रुपये
लतिका इनामदार- 10 लाख रुपये
सनिका चालके- 10 लाख रुपये
अक्षिता भगत-10 लाख रुपये
भारती रावल- 10 लाख रुपये
आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्सचा संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), श्वेता सहरावत, दिशा कासट, सानिका चालके, राहिला फिरदौस, लतिका इनामदार, नट सिवर ब्रंट, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, निकोला कॅरी, अमनजोत कौर, सजीवन सजना, संस्कृति गुप्ता, अक्षिता भगत, शबनीम इस्माइल, तारा नॉरिस, वैष्णवी शर्मा, भारती रावल