SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

यशस्वी आणि रवी बिष्णोई मुंबई इंडियन्समध्ये जाणार होते, पण पोलार्डने पूर्ण गेम फिरवला

Mumbai Indians : मुंबई इंडियन्स हार्दिकच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि रवी बिष्णोईला घेण्याच्या तयारीत होते, मात्र नव्याने हेड कोच झालेल्या कायरन पोलार्डने संपूर्ण रणनीती बदलली.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 28, 2026, 14:54 IST | Updated: Nov 28, 2026, 16:26 IST
Image Credit: यशस्वी आणि रवी बिष्णोई मुंबई इंडियन्समध्ये जाणार होते, पण पोलार्डने पूर्ण गेम फिरवला
Join

Mumbai Indians : आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सने त्यांचा माजी कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून पंजाब किंग्सकडे पाठवलं तर पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंह याला ट्रेड करून मुंबईने आपल्या संघात घेतलं. मात्र एका रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्सला हार्दिकच्या बदल्यात राजस्थान रॉयल्समधील यशस्वी जयस्वाल आणि रवी बिष्णोई यांना ट्रेड करून आपल्या संघात घ्यायचं होतं. मात्र मुंबईचा नवा हेड कोच कायरन पोलार्डच्या सल्ल्यानंतर फ्रेंचायझीची प्राथमिकता बदलली आणि त्यानंतर मुंबईला फलंदाज आणि स्पिनर शिवाय एक मजबूत भारतीय वेगवान गोलंदाजाची आवश्यकता असल्याचं वाटलं.

हार्दिक पांड्याच्या ट्रेडमध्ये पोलार्डने बदलला गेम :

अहवालात नमूद केल्यानुसार, हार्दिक पांड्याबाबतच्या सुरुवातीच्या चर्चेत मुंबई इंडियन्सची योजना एक फलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज मिळवण्याची होती. या संदर्भात यशस्वी जयस्वाल आणि रवी बिश्नोई यांच्याबाबत राजस्थान रॉयल्सशीही चर्चा झाली होती. राजस्थानच्या व्यवस्थापनाने या प्रस्तावावर गांभीर्याने विचारही केला होता.

दावा करण्यात आला आहे की फ्रेंचायझीची सोशल मीडिया टीम हार्दिक पांड्या सोबत शूटसाठी बंगळुरूमध्ये गेली होती. मात्र या प्रवासाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे. काही अहवालांनुसार, राजस्थानचे प्रशिक्षक कुमार संगकारा देखील बेंगळुरूला गेले होते. तसेच, संघातील इतर सदस्य तिथे कर्णधार रियान परागची भेट घेण्यासाठी आणि युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीसोबत एका शूटमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याचेही सांगण्यात आले.

मुंबईत कुठे आहे रोहित शर्माचं घर? आलिशान फ्लॅटची किंमत ऐकून थक्क व्हाल, पाहा Inside Photos
 

कायरन पोलार्डचं टार्गेट होतं वेगवान गोलंदाज :

हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत बातचीत सुरु असताना मुंबई इंडियन्सने आपल्या रणनीतीत बदल केला. सांगितलं जातंय की  कायरन पोलार्डने संघासाठी एका वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे असं सांगितलं. यानंतर मुंबईने एका भारतीय वेगवान गोलंदाजासाठी विविध फ्रँचायझींशी शक्यता पडताळून पाहायला सुरुवात केली. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सकडे हर्षित राणाबद्दल चौकशी केली आणि जोफ्रा आर्चरच्या बाबतीत राजस्थान रॉयल्सशी संपर्क साधण्याचाही विचार केला. अखेरीस मुंबईने अर्शदीप सिंगसाठी पंजाब किंग्ससोबत करार केला.

मुंबई अजूनही जयस्वालला घेण्यासाठी उत्सुक :

अर्शदीप संघात सामील झाला असला, तरी मुंबई इंडियन्सचा यशस्वी जैस्वालमधील रस पूर्णपणे संपला आहे असे म्हणता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अजूनही जैस्वालसाठी थेट रोख रकमेचा व्यवहार करण्याचा विचार करू शकते. तो संघासाठी दीर्घकालीन एक भक्कम सलामीचा पर्याय ठरू शकतो आणि आगामी अनेक लिलावांमध्ये तो फ्रँचायझीच्या योजनांचा भाग राहू शकतो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES