पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाची संगीत खुर्ची...तीन वर्षांत 8 कर्णधार बदलले! कधी बाबर तर कधी फरहान
एकेकाळी जेव्हा इम्रान खान, शोएब अख्तर सारखे दिग्गज खेळाडू संघामध्ये खेळायचे त्यावेळी पाकिस्तान संघ प्रभावी कामगिरीसाठी ओळखला जात होता. पण आता पाकिस्तानची अवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच विकट झाली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची संगीत खुर्चीच्या खेळाबद्दल जाणून घ्या.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी पुरुष संघाच्या कर्णधारपदाची संगीत खुर्चीचा खेळ बनवला आहे असे दिसून येत आहे. सातत्याने पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये होणारे बदल हे बदल फक्त संघातील खेळाडूंमध्येच नाही तर कर्णधार देखील सातत्याने बोर्ड बदलत असल्याचे दिसून येत आहे. मागील एक वर्षामध्ये अनेक कर्णधार पाकिस्तानी संघामध्ये बदलले आहेत कधी सलमान अली आघा तर कधी बाबर आझम तर कधी साहिबजादा फरहान. एकेकाळी जेव्हा इम्रान खान, शोएब अख्तर सारखे दिग्गज खेळाडू संघामध्ये खेळायचे त्यावेळी पाकिस्तान संघ प्रभावी कामगिरीसाठी ओळखला जात होता. पण आता पाकिस्तानची अवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच विकट झाली आहे.
पाकिस्तानचा कर्णधार पुढील कोण असू शकतो हे कोणाला माहिती नाही हे फक्त कदाचित पाकिस्तान क्रिकेट बोर्डच सांगू शकतो. अनेक महान क्रिकेट तज्ञांनी असेही सांगितले आहे की पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार हा कपड्यांप्रमाणे बदलत आहे. हे तज्ञांचे विधान चुकीचे नाही कारण कर्णधार बदलण्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रेकॅार्ड ब्रेकिंग कामगिरी केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाची मागील तीन वर्षामध्ये 8 कर्णधार बदलण्यात आले आहेत. पाकिस्तान संघातील कर्णधारपदातील बदल नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू झाले. तेव्हापासून ते अव्याहतपणे सुरूच आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील मानहानीकारक पराभवानंतर, बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर संघाचा कर्णधार बदलण्यात आला. नोव्हेंबर 2023 मध्ये पाकिस्तानची टी20 संघाचे कर्णधारपद हे शाहीन आफ्रिदीला देण्यात आले. तथापि, तो जास्त काळ कर्णधार म्हणून टिकू शकला नाही वर्ष बदलले आणि संघाचा कर्णधार देखील बदलण्यात आला. मार्च 2024 मध्ये आफ्रिदीने पाकिस्तानच्या टी२० कर्णधारपदाचा त्याग केला. त्यानंतर 2024 च्या विश्वचषकाआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद बे बाबर आझमकडे सोपवण्यात आले. तथापि, या स्पर्धेतही पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर बाबर आझमवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
बाबर आझमवर 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर झालेल्या टीकेनंतर बाबरने कर्णधारपदाचा त्याग करण्यात आला. मार्च 2025 च्या आशिया कपपूर्वी, पीसीबीने सलमान अली आगावर पुन्हा विश्वास दाखवला. मात्र, कर्णधार म्हणून तोही उत्कृष्ट कामगिरी करू शकला नाही आणि भारताने पाकिस्तानला सलग तीन वेळा पराभूत करून आशिया कप जिंकला. त्यानंतर सलमान अली आघाला कर्णधारपदावरुन हटवण्यात आले, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता युवा खेळाडू साहिबजादा फरहानची नवीन टी20 कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.