SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नाव न घेता पृथ्वी शॉने युवराज सिंहच्या वडिलांना दिली वॉर्निंग, नेमकं काय घडलं?

Prithvi Shaw Yograj Singh : पृथ्वी शॉने त्याच्या विरुद्ध नकारात्मक गोष्ट पसरवणाऱ्यांना वॉर्निंग दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी युवराज सिंहचे वडील आणि माजी क्रिकेटर योगराज सिंह यांनी पृथ्वी शॉच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर पृथ्वीने ही पोस्ट लिहिली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 23, 2026, 19:29 IST | Updated: Nov 23, 2026, 20:07 IST
Image Credit: नाव न घेता पृथ्वी शॉने युवराज सिंहच्या वडिलांना दिली वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Join

Prithvi Shaw Yograj Singh : क्रिकेटर पृथ्वी शॉने आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करणाऱ्यांना आता वार्निंग दिली आहे. माजी क्रिकेटर आणि स्टार क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांना उद्देशून पृथ्वीने ही वॉर्निंग दिली असून त्याने याबाबत म्हंटलं की  त्याच्याजवळ भूतकाळाबाबत लपवण्यासारखे काही नाही, मात्र तो त्याच्याविषयी कोणतीही नकारात्मक गोष्ट पसरवणे आणि त्यातून कोणी फुकट पब्लिसिटी मिळवत असेल तर तो त्याच्या विरोधात आहे.

योगराज सिंहने काही दिवसांपूर्वीच एका युट्युबरशी बोलताना पृथ्वी शॉच्या करिअर आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत टिपण्णी केली होती. योगराजने पृथ्वीच्या करिअरमध्ये आलेल्या घसरणीचे कारण त्याच्या जीवनशैलीला दिले; ज्यामध्ये पार्ट्या करणे, मद्यपान करणे आणि चुकीच्या संगतीत राहणे यांचा समावेश होता. त्याने या भारतीय फलंदाजाच्या परिस्थितीची तुलना माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या परिस्थितीशीही केली.

काय म्हणाले योगराज सिंह?  

योगराज सिंहने एका यूट्यूब चॅनलशो बोलताना म्हंटले की, 'पृथ्वी शॉचं करिअर का खाली गेलं? त्याआधी विनोद कांबळी सोबत सुद्धा हेच झालं होतं. त्याचं कारण पार्टी, अय्याशी, सिगारेट, आणि दारू ही होती. मी एकदा कांबळीला विचारलं होतं की, बेटा तू हे काय करतोयस? तुझ्यात इतकं टॅलेंट आहे. तुम्ही पहाटे अडीच वाजता आपल्या खोलीवर परतता. तुम्हाला सांगितले जाते, 'तुमचा काळ संपला आहे; आता आम्ही वेगळ्या प्रकारची क्रिकेट खेळत आहोत'. दुसऱ्याच दिवशी सकाळी, कोर्टनी वॉल्शने तुम्हाला बाद केले आणि भारत तो सामना हरला. त्यानंतर त्याच्यासोबत असलेली स्त्रीही तुम्हाला सोडून निघून गेली आणि एकाही व्यक्तीने त्याला सिगारेट किंवा मद्यपान करण्याची साधी विचारणाही केली नाही. शॉच्या बाबतीतही अगदी असेच घडले. जर तुम्ही पार्ट्यांमध्ये जात असाल, अय्याश जीवन जगत असाल, मद्यपान करत असाल आणि चुकीच्या संगतीत राहत असाल, तर तुमची अवस्थाही अगदी त्यांच्यासारखीच होईल'.

हेही वाचा : याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला

पृथ्वी शॉने दिली लीगल नोटीसची वॉर्निंग :

योगराज सिंहच्या या प्रतिक्रियेवर पृथ्वीने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून पलटवार केला. पृथ्वी शॉने इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'माझा भूतकाळ हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि माझ्याकडे लपवण्यासारखे किंवा लाज वाटण्यासारखे काहीही नाही. मात्र जे लोक जाणीवपूर्वक माझे नाव, माझे वैयक्तिक आयुष्य किंवा माझा भूतकाळ वापरून नकारात्मकता पसरवतात, विनाकारण वाद निर्माण करतात, माझी प्रतिमा मलिन करतात किंवा माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मी अजिबात खपवून घेणार नाही. हा एक स्पष्ट आणि अंतिम इशारा समजावा. अशा प्रकारच्या कृतींमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते'.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES