SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ऋषभ पंतने न्यूझीलंड विरुद्ध ठोकलं शतक, टेस्ट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सहावा भारतीय

Rishabh Pant Scored Century IND VS NZ Test : रविवारी पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने जबरदस्त खेळी करून शतक ठोकलं. यासह त्याने रेकॉर्ड सुद्धा नावावर केला.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 22, 2026, 06:36 IST | Updated: Nov 22, 2026, 07:24 IST
Image Credit: ऋषभ पंतने न्यूझीलंड विरुद्ध ठोकलं शतक, टेस्ट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सहावा भारतीय
Join

IND VS NZ Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे पहिला टेस्ट सामना खेळवला जात आहे. रविवारी पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने जबरदस्त खेळी करून शतक ठोकलं.  ऋषभ पंतने 135 बॉलचा सामना करून शतक पूर्ण केलं, त्यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. ऋषभ पंतच्या टेस्ट करिअरमधील हे 9 वं शतक होतं तर न्यूझीलंड विरुद्ध त्याने प्रथमच टेस्ट क्रिकेटमध्ये शतक ठोकलं.

जेव्हा ऋषभ पंत 133 बॉलमध्ये 95 धावांवर पोहोचला, तेव्हा त्याने आपल्या खास शैलीत शतक पूर्ण केले. पुढच्या दोन बॉलवर त्याने एक चौकार आणि त्यानंतर एक षटकार लगावला. अशा प्रकारे, त्याने 135 बॉलमध्ये शतकाचा टप्पा ओलांडला. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील शेवटच्या बॉलवर तो रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्याची खेळी संपुष्टात आली. त्याने एकूण 153 बॉलचा सामना करत 128 धावा केल्या, त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

हेही वाचा : रविवार ठरणार ब्लॉकबस्टर! भारत - पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने; तिलक, वैभव, रिंकू यंग ब्रेगेड करणार पाकशी भिडणार

अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय विकेटकिपर :

न्यूझीलंडविरुद्धचे हे ऋषभ पंतचे पहिले टेस्ट शतक असून, न्यूझीलंडच्या भूमीवरचेही त्याचे हे पहिलेच शतक आहे. तो असा पहिला भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे. आणि कुमार संगकारांनंतर आशियातील केवळ दुसरा खेळाडू ज्याने सर्व 'SENA' देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) टेस्ट शतक झळकावले आहे.

असा करणारा सहावा भारतीय :

ऋषभ पंत हा सर्व SENA देशांमध्ये कसोटी शतक झळकावणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे केएल राहुलने वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या टेस्ट सामन्यादरम्यान हा टप्पा गाठला.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES