SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यावर काय म्हणाला रोहित शर्मा? IPL 2027 साठी काय असणार प्लॅन? वाचा सविस्तर

Rohit Sharma Captain Mumbai Indians : आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्सने त्यांचा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल तीन सीजननंतर रोहितकडे पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व आलं असून यानंतर आगामी सीजनसाठी कर्णधार म्हणून रणनीती कशी असणार याविषयी रोहितने मुंबई इंडियन्सने जाहीर केलेल्या निवेदनात भाष्य केलं आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 27, 2026, 18:03 IST | Updated: Nov 27, 2026, 18:36 IST
Image Credit: पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यावर काय म्हणाला रोहित शर्मा?
Join

Rohit Sharma Captain Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आगामी आयपीएल 2027 साठी त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या 20 व्या सीजनचा कर्णधार असणार असून शुक्रवारी संध्याकाळी 5  वाजून 45 मिनिटांनी मुंबईने याबाबत मोठी घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वात याआधी मुंबई इंडियन्सने 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. आयपीएल 2023 नंतर जवळपास 3 वर्षांनी रोहित शर्माकडे पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करेल.

काय म्हणाला रोहित शर्मा?

पुन्हा एकदा आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यावर रोहितने फ्रेंचायझीचे आभार मानले. तसेच मुंबई इंडियन्सकडून जाहीर केलेल्या निवेदनात रोहित शर्मा म्हणाला की, 'मुंबई इंडियन्स माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग राहिला आहे आणि या संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट राहिली आहे. आगामी सीजनबाबत नीता भाभी आणि आकाश यांच्यासोबत झालेली चर्चा अतिशय उत्साहवर्धक होती आणि आपण काय साध्य करू शकतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे'.

आगामी सीजनसाठी संघाचा प्लॅन कसा असणार हे सांगताना रोहित म्हणाला की, 'मी 20 व्या सीजनसाठी, पुढील आव्हानांसाठी आणि आमच्या पलटनला आनंद साजरा करण्याच्या अनेक संधी मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. आमचा मुख्य भर आमच्या शैलीतील क्रिकेट खेळण्यावर, एकत्रितपणे स्पर्धा करण्यावर आणि खेळाचा आनंद घेण्यावर असेल'.

 रोहित शर्माची आयपीएल कारकीर्द : 

रोहित शर्मा हा 2011 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग बनला. यापूर्वी तो डेक्कन चार्जसकडून खेळत होता. रोहित शर्मा 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019, आणि 2020 रोजी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. रोहित शर्मा 2023 सीजन पर्यंत मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता, मात्र त्यानंतर हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. आयपीएल 2024 ते 2026 हे तीन सीजन हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाचा परफॉर्मन्स ढासळला. त्यानंतर हार्दिकला आयपीएल 2027 पूर्वी पंजाब किंग्सकडे ट्रेड करण्यात आल्यावर रोहित शर्माकडे पुन्हा एकदा नेतृत्व सोपवण्यात आलं. रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 281 सामने खेळले असून यात त्याने 7329 धावा, 15 विकेट्स घेतले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES