• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /'माझी पत्नी रडत होती, वडील दुखी होते...', ड्रेसिंग रूममधील माहिती लीक वादानंतर नेमकं काय घडलं? सरफराज खानने सगळं सांगितलं

'माझी पत्नी रडत होती, वडील दुखी होते...', ड्रेसिंग रूममधील माहिती लीक वादानंतर नेमकं काय घडलं? सरफराज खानने सगळं सांगितलं

Sarfaraz Khan : भारतीय क्रिकेटर सरफराज खान याने आकाश चोपडाच्या 'बैठ और बोल' या शोमध्ये मुलाखत दिली. यावेळी त्याने क्रिकेट करिअरमधील विविध घटनांवर भाष्य केलं. तसेच ड्रेसिंग रूममधील माहिती लीक प्रकरणानंतर गौतम गंभीर त्याला फोन करून काय म्हणाला होता याबाबत सुद्धा सांगितलं.

Reported Bypooja pawar
Published: Nov 21, 2026, 13:54 IST|Updated: Nov 21, 2026, 14:25 IST
joinshare
'माझी पत्नी रडत होती, वडील दुखी होते...', ड्रेसिंग रूममधील माहिती लीक वादानंतर नेमकं काय घडलं? सरफराज खानने सगळं सांगितलं
Image Credit: 'माझी पत्नी रडत होती, वडील दुखी होते...', ड्रेसिंग रूममधील माहिती लीक वादानंतर नेमकं काय घडलं? सरफराज खानने सगळं सांगितलं

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Sarfaraz Khan : क्रिकेटर सरफराज खानला मागील काही दिवसांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान माजी क्रिकेटर आकाश चोपडा याच्या 'बैठ और बोल' या शोमध्ये सरफराज खानला बोलवण्यात आलं होतं. यावेळी मुलाखतीदरम्यान सरफराज खानला त्याच्यवर ड्रेसिंग रूममधील संघाच्या चर्चा बाहेर लीक करण्याचा आरोप झाला होता त्याबाबत विचारण्यात आले. या घटनेची आठवण काढताच सरफराज खूप उदास झाला त्याने सांगितलं की  यादरम्यान त्याच्या जवळच्या व्यक्ती सुद्धा त्याचे फोन कॉल उचलत नव्हते, मात्र त्यावेळी गौतम गंभीरने त्याला पहिला कॉल केला.

आकाश चोपडाने जेव्हा सरफराजला त्याच्यावर ड्रेसिंगरूममधील गोष्टी बाहेर लीक करण्याचा आरोप झाला त्याबाबत विचारले तेव्हा सरफराज म्हणाला की, 'सुरुवातीला मला खूप दुःख झालं की असं का घडलं, असा प्रश्न मला पडला होता. मी नुकताच विमान प्रवास करून खाली उतरलो होतो, तेव्हाच मला फोन आणि संदेश येऊ लागले आणि ही बातमी सर्वत्र सोशल मीडियावर पसरू लागली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान मला दुखापत झाली होती आणि मी एनसीए (NCA) मध्ये रिहॅब प्रक्रियेतून जात असतानाच ही बातमी समोर आली.

तो पुढे म्हणाला की, 'मी कोणाशी बोलणार होतो? कारण असं काहीच नव्हतं, जर असं असतं तर मला पुन्हा इंडिया ए मध्ये सामील केलं नसतं. आता मी श्रीलंकेला गेलो होतो. मग सोशल मीडियावर हे सगळं कसं सुरु झालं? मला काहीच कल्पना नाही. पण मला त्यावेळी खूपच वाईट वाटलं होतं'.

हेही वाचा : रविवार ठरणार ब्लॉकबस्टर! भारत - पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने; तिलक, वैभव, रिंकू यंग ब्रेगेड करणार पाकशी भिडणार

DRESSING ROOM NEWS CONTROVERSY: GAMBHIR CALLED SARFARAZ PERSONALLY  After allegations that Sarfaraz Khan leaked dressing-room news, he was under a lot of stress. Gautam Gambhir personally called him and advised him not to get involved in unnecessary politics and to focus only on his cricket. Gambhir also spoke to Sarfaraz's father and reassured his family during the difficult time.

Sam (cricsam02) November 20, 2026

लोकांनी फोन उचलणं बंद केलेलं :

 

सरफराज म्हणाला, 'अशा कठीण काळात लोक फोनही उचलत नाहीत. माझ्या कुटुंबासाठी तो काळ अत्यंत कठीण होता. माझ्या बाबतीत सांगायचे तर, माझे आयुष्यच संघर्षाने भरलेले आहे, त्यामुळे मी हे सहन करू शकतो. पण मला माझ्या वडिलांची खूप काळजी वाटते. मला माझ्या पत्नी, भाऊ आणि आईबद्दलही वाईट वाटले. सोशल मीडियावर तर अगदी छोट्या गोष्टीलाही खूप मोठे स्वरूप दिलं जातं'.

पहिला फोन गौतम गंभीरचा आला :

सरफराज खानने सांगितलं की, 'दोन दिवसांनी त्याला गौतम गंभीरचा फोन आला. त्यांनी मला खेळावर लक्ष केंद्रित करायला सांगितले आणि म्हणाले की त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस, हे सगळं फक्त राजकारण आहे'. सरफराजने पुढे म्हणाला की, 'मी त्याला सांगितले की माझे वडील अस्वस्थ आहेत आणि माझी पत्नी रडत आहे. तेव्हा त्याने माझ्या वडिलांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि म्हटले, की सरफराज एक चांगला क्रिकेटपटू आहे त्याला खेळू द्या; तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका'. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india