• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /'माझ्या परवानगीशिवाय...', शिखर धवन T20 लीगवर संतापला! खेळाडूने कारवाई करण्याची दिली धमकी

'माझ्या परवानगीशिवाय...', शिखर धवन T20 लीगवर संतापला! खेळाडूने कारवाई करण्याची दिली धमकी

हाँगकाँगमध्ये वर्ल्ड टी20 कॉन्टिनेंटल कप 2026 ची पहिली आवृत्ती खेळवली जाणार आहे, या स्पर्धेवर भारताचा माजी खेळाडू शिखर धवन याने कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 14, 2026, 02:22 PM IST|Updated: Oct 14, 2026, 02:37 PM IST
joinshare
'माझ्या परवानगीशिवाय...', शिखर धवन T20 लीगवर संतापला! खेळाडूने कारवाई करण्याची दिली धमकी

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

वर्ल्ड टी20 कॉन्टिनेंटल कप 2026 ची पहिली आवृत्ती हाँगकाँगमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये चार संघ सहभागी होणार आहेत, यामध्ये एशिया वॉरियर्स, आफ्रिका लायन्स, युरोप चॅम्पियन्स आणि नॉर्थ अमेरिका ईगल्स हे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आता या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडूंचा संघाची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये भारताचा स्टार माजी खेळाडू शिखर धवनचे देखील या स्पर्धेमध्ये नाव आहे. पण या संघाची घोषणा झाल्यानंतर नवा वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे, भारताचा माजी खेळाडू शिखर धवनने एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्याने या स्पर्धेमध्ये संमतीशिवाय नाव वापरल्याचे सांगितले आहे. नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

शिखर धवन याचे नाव एशिया वॉरियर्स संघाचे नेतृत्व भारतीय अनुभवी खेळाडू शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. यामुळे त्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने लीगच्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली आहे.  धवनने 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, "मला समजले आहे की वर्ल्ड टी20 कॉन्टिनेंटल कपमध्ये सहभागी म्हणून माझ्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. आयोजकांनी माझ्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय माझ्या नावाचा वापर केला आहे. माझी टीम या प्रकरणी योग्य कायदेशीर कारवाई करेल."

हे ही वाचा

ऑस्ट्रेलिया नंबर 1 तर भारत बांगलादेशच्या मागे, डर्बन कसोटीनंतर WTC गुणतालिकेचे चित्र बदलले!

त्याने पुढे लिहिले, "मी मीडिया आणि माझ्या चाहत्यांना विनंती करतो की कोणत्याही अनधिकृत घोषणेवर विश्वास ठेवू नका किंवा ती प्रसिद्ध करू नका. तुमच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद." त्याच्या या सोशल मिडियावर केलेल्या पोस्टनंतर क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोक येत आहेत. शिखर धवनने संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली आहे.

I have come across my name as a participant in the World T20 Continent Cup. My name has been used by the organisers without my knowledge or permission, and my team will be taking the appropriate legal steps to address this. I request the media and my fans to not report or rely on any unauthorised announcements. Thank you for your continued love and support. 

— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 13, 2026

 

धवन प्रो स्टार क्रिकेट लीगमध्ये दिसणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. याची सुरुवात श्रीनगरमध्ये होईल आणि अंतिम सामना डेहराडूनमध्ये होईल. धवनला, जम्मू आणि काश्मीरचा क्रिकेटपटू परवेझ रसूलसोबत, लीगचा 'आयकॉनिक प्लेयर' म्हणून घोषित करण्यात आले आहे. परवेझने 2014 मध्ये भारतासाठी पदार्पण केले आणि एक एकदिवसीय व एक टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. भारताचा माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा हे प्रो स्टार क्रिकेट लीगचे आयुक्त आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sports News
Cricket News
Marathi News